सांगली :-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या एका सहा वर्षांच्या चिमुरड्या मुलास जन्मदात्या पित्यानेच विहिरीत टाकून ठार मारण्याचा धक्कादायक प्रकार खानापूर तालुक्यातील लेंगरे येथे नुकताच उघडकीस आला आहे.याबाबत मुलाचे अपहरण झाल्याचा बनावही महिलेने केला होता परंतु पोलिसांनी शिताफीने प्रियकरासह महिलेला अटक करण्यात यश मिळविले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील ज्योती लोंढे वय २५ या विवाहित महिलेने मुलगा शौर्य याचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार दि.६ मे रोजी दिली होती.सदर मुलाचा तपास करीत असताना त्याचा पार्थिव विहिरीत तरंगत असल्याचे आढळून आले त्यावेळी आईकडे चौकशी केली असता मुलाचा खून करण्यात आला असल्याची बाब समोर आली आहे.सदरील ज्योती लोंढे या महिलेचे रुपेश घाडगे वय २८ या तरुणासोबत गेल्या काही वर्षापासून अनैतिक सबंध होते व दोघांनाही लग्न करायचे होते मात्र या मुलाचा अडथळा होत असल्यामुळे शौर्य या चिमुरड्या मुलाची हत्या करण्यात आली.रुपेश घाडगे यांने खूनानंतर मृतदेह विहिरीत नेऊन टाकला असे तपासात निष्पन्न झाले आहे.याकामी उपअधीक्षक पद्मा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके,उपनिरीक्षक पांडूरंग कणेरे यांनी कौशल्याने तपास करीत हा प्रकार उघडकीस आणत प्रेमी युगल जोडप्याला संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे.