Just another WordPress site

“केंद्रातील सत्ता गेल्यावर नरेंद्र मोदी हे सुद्धा तुरुंगात जाऊ शकतात?” प्रकाश आंबेडकर यांचे विधान

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठे विधान केले असून कर्नाटक निवडणूक व  केंद्रातील सत्ता गेल्यावर नरेंद्र मोदी हे सुद्धा तुरुंगात जाऊ शकतात कारण जे काही पेरलेले असते तेच उगवते त्यामुळे मोदींनी जे पेरले आहे तेच उद्याच्या राजकारणाचा भाग होईल अशी परिस्थिती दिसत असल्याचे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.पिंपरी चिंचवड येथे  वडार समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोल्ट होते.राजकारणात चोरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पकडत आहेत मात्र त्यांचे पकडणे मी गैर मानतो कारण पकडल्यावर ती प्रकरणे पूर्णत्वास जात नाहीत.तीन चार वर्षे कारागृहात ठेवून भीतीचे वातावरण निर्माण केले जात असून हे मानसिकतेवर आघात करण्याचे धोरण आहे.त्यामुळे कर्नाटक आणि केंद्रातील सत्ता गेल्यावर नरेंद्र मोदीही तुरुंगात जाऊ शकतात.जे काही पेरलेले असते तेच उगवते म्हणून मोदींनी जे पेरले आहे तेच उद्याच्या राजकारणाचा भाग होईल असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.

पोस्कोचा गुन्हा दाखल झाल्यावर तातडीने अटक होते मात्र गुन्हा दाखल होऊनही ब्रिजभूषण सिंह यांना अटक झाली नाही.दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे.आता तुमचा प्रश्न मिटला असे न्यायाधीशांनी म्हणणे चुकीचे आहे.पोस्कोचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीला कधी पकडणार हे न्यायालयाने विचारले पाहिजे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? असा प्रश्न विचारल्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले,“मी आपला साधा कार्यकर्ता आहे.कार्यकर्ता म्हणूनच मी आनंदी आहे त्यामुळे मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.