“इलेक्टेडपेक्षा सिलेक्टेड लोक देश चालवत असून राजभवन भाजापाचे हेडऑफिस तर राज्यपाल स्टार कंम्पेनर” – भगवंत मान यांची सणसणीत टीका
देशभरात विरोधकांची एकजूट करण्याकरता बैठकांना जोर आला असून दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल आज दि.२४ मे रोजी मुंबई दौऱ्यावर आले आहेत त्यांच्यासोबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानसुद्धा उपस्थित होते.या दोघांनीही ठाकरे कुटुंबियांची भेट घेऊ चर्चा केली त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.भगवंत मान म्हणाले की,“भारतात लोकशाही धोक्यात आहे,भारी धोक्यात आहे.इलेक्टेडपेक्षा सिलेक्टेड लोक देश चालवत आहेत.हे सरकार सिलेक्टेड आहे.आपल्या मर्जीचेच राज्यपाल ठेवतात.राज्यपालांविरोधात आम्हालाही सुप्रिम कोर्टात जावे लागले.राजभवन भाजापाचे हेडऑफिस बनले आहे तर गर्व्हनर स्टार कंम्पेनर बनले आहेत अशी सणसणीत टीका भगवंत मान यांनी केली.