यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्ताने समता फाऊंडेशन व लोकसेवक मधुकरराव चौधरी कालेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच तालुका व शहर काँग्रेस कमिटी तर्फे आज दि.२५ मे २३ गुरुवार रोजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थित यावलच्या सहकारी शेतकी संघ यावल येथे निशुल्क नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया तसेच कुपोषित बालके व गर्भवती मातांसाठी तपासणी व औषध उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी आपल्या शहर व तालुक्यातील पदाधिकारी,सरपंच,नगरसेवक,सर्व सेलचे अध्यक्ष व सदस्य कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे व आपल्या परिसरातील शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना व नातेवाईक मित्रमंडळींना या आरोग्य शिबिरात सहभागी होवुन रुग्णांच्या उपचार करणेसाठी प्रयत्न करावे असे आवाहन यावल तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे,एनएसयूआय प्रदेश सरचिटणीस धनंजय चौधरी,काँग्रेस कमेटी यावल शहराध्यक्ष कदीर खान यांनी केले आहे.