नवी दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रसार माध्यम सल्लागार हिरेन जोशी हे देशातील मीडिया चॅनेल्सच्या मालकांना आणि संपादकांना धमकवतात असा खळबळजनक आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.याबाबतचे स्क्रिनशॉट शेअर केले तर मोदींना तोंड दाखवायला जागा मिळणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
केजरीवाल पुढे म्हणाले की, मला हिरेन जोशीना एकच सांगायचे आहे की, तुम्ही केलेला मेसेज आणि धमकीचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर टाकला तर तुम्हाला आणि पंतप्रधानांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमच्या धमक्या रेकॉर्ड करून ठेवल्या आहेत, सोशल मीडियावर या धमक्या टाकल्या तर तुम्ही तोंड दाखवू शकणार नाही त्यामुळे धमक्या देणं बंद करा असा इशाराही त्यांनी दिला आहे.