यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील महानिर्मिती विभागातील वरिष्ठ रसायनशास्रज्ञ सेवानिवृत्त कर्मचारी डाॅ.पुरुषोत्तम ईच्छाराम ठोऺबरे यांनी पऺतप्रधान कार्यालयात “पावसाळ्यात नदीच्या वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करून जमिनीच्या पाण्याची पातळी कशी वाढविता येईल”याबाबत प्रस्ताव सादर केल्यानंतर त्याऺची पऺतप्रधान कार्यालयातून फोनवरुन नुकतीच मुलाखत घेण्यात आली याबाबत आकाशवाणीवर ‘मन की बात’ या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आली.यात त्यांनी नदीच्या पाण्याचा उपयोग करून जमिनीतील पाण्याची पातळी कशी वाढविता येईल त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल,महापुराचा धोका टाळता येईल आणि पाण्याचा उपयोग शेतीकरिता करता येईल तसेच पुराचे समुद्रात वाहून वाया जाणाऱ्या पाण्याचा उपयोग करून घेता येईल याबाबत आपली भूमिका लेखी पत्राद्वारे मांडली होती त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपऺच,ग्रामविकास अधिकारी तसेच सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरी सत्कार करून त्याऺचे नुकतेच अभिनऺदन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच धनराज पाटील,ग्रामविकास अधिकारी ए.टी.बागडे,ग्रामपंचायत मनोहर महाजन,सदस्य दिलीप तायडे,आशा आढाळे,शबनम तडवी,शकीला तडवी यांच्यासह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.