पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दि.२६ शुक्रवार रोजी स्पष्ट केले आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस यांनी असे प्रतिपादन केले असून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर सरकार पडेल त्यामुळे विस्तार होत नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्याला उत्तर देताना नाना पटोले व संजय राऊत हे बोलघेवडे लोक आहेत तुम्हाला काम पाहिजे म्हणून ते बोलतात.आम्हाला खूप कामे आहेत त्यामुळे आम्ही त्यांना उत्तर देत नाही असे म्हणत मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.संजय राऊत यांच्या आरोपाबाबत विचारताच कोण संजय राऊत असा प्रतिसवाल करत फडणवीस यांनी यावेळी राऊत यांची खिल्ली उडविली.