महाराष्ट्र सरकारच्या गुटखाबंदी आदेशाला तेल्हारा शहरात गुटखा माफियांकडून ठेंगा”?
तेल्हारा शहरात गुटखा माफिया राज ? तेल्हारा पोलिसांची भूमिका संशयास्पद?
गोपाल शर्मा ,पोलीस नायक
अकोला जिल्हा (प्रतिनिधी) :-
संपूर्ण राज्यात महाराष्ट्र सरकारने गुटखाबंदी केल्यानंतरही तेल्हारा शहरात गुटखाबंदीच्या आदेशाला गुटखा माफियांकडून ठेंगा दाखविण्यात येत असल्याने तेल्हारा शहरात गुटखा माफी यांचा राज सुरू आहे की काय? तसेच गुटखा माफियांच्या गुटखा विक्रीच्या व्यवसायाला तेल्हारा शहरात आशीर्वाद कोणाचा? व तेल्हारा पोलीस महाराष्ट्र सरकार करून पगार घेत आहेत व गुटखा माफियांचे कर्तव्य बजावत आहेत काय? हा संशोधनाचा विषय ठरत असून याबाबतची तेल्हारा पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा शहरवासियांमध्ये चर्चिली जात आहे.
तेल्हारा शहरात पोलिसांच्या आशीर्वादाने गुटखा माफिया राज सुरु असल्याची चर्चा शहरात जोरदार सुरु असून गुटखा माफियांचे टावर चौक परिसर व बस स्थानक परिसरात मोठमोठे अड्डे सुरु असल्याची चर्चा तेल्हारा शहरात सुरू आहे.यात संत तुकाराम चौक,बसस्थानक परिसर, शेगाव नाका,मालेगाव नाका,आठवडी बाजार,टॉवर चौक परिसर येथे लहान मोठ्या पान टपऱ्या व लहान मोठे हॉटेल येथे बिनदिक्कतपणे व निर्धास्तपणे गुटख्याची विक्री सुरू असून ठिकठिकाणी गुटख्याच्या रिकाम्या झालेल्या पुड्यांचा सडा रस्त्यामध्ये पडलेला दिसून येत असून या रिकाम्या पुड्या कुठून येतात ? या गुटक्याची विक्री कोण करतो? याची जाणीव तेल्हारा पोलिसांना नाही काय? तेल्हारा पोलीस स्टेशनला हप्ते खोरीची लागण लागली आहे काय? हप्ते खोरीची लागण कुठपर्यंत पोचली आहे? याची चौकशी आयकर विभाग,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केल्यावरच सत्य जनतेसमोर येणार असल्याची चर्चा तेल्हारा शहरात जोराने सुरू आहे.
गुटख्याच्या व्यसनामुळे तरुण मुले व्यसनाधीनतेकडे वळत असून कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराचे बळी पडत आहे.सदरील गुटखा हा मध्यप्रदेश मधून अकोला जिल्ह्यात व तेथून तेल्हारा शहरात येत आहे यावेळी अकोला जिल्ह्यातील संपूर्ण पोलीस प्रशासन काय झोपा काढत आहेत काय?”दिन उगने दो,हफ्ता आने दो” हिंदी भाषेतील म्हण तेल्हारा शहरात खरी ठरत आहे काय?व त्यामुळे तेल्हारा शहरात गुटखा विक्रीला “हप्ते खोरी”जबाबदार असल्याची चर्चा तेल्हारा शहरात सुरू आहे.परिणामी गुटखा माफियांना सुगीचे दिवस पाहायला मिळत आहे.याबाबत तेल्हारा शहरात हप्तेखोर आहेत काय? कोणकोण आहेत ?त्यांची संख्या किती आहेत ?त्यांची नाव काय आहेत? शहरात गुटखा माफियांची संख्या किती आहे? या प्रश्नांचा जिल्हा पोलीस अधीक्षक,विशेष पोलीस महानिरीक्षक,अतिरिक्त पोलीस महासंचालक,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी शोध लावणे गरजेचे असून महाराष्ट्र सरकारच्या गुटखाबंदीच्या आदेशाला न मानणाऱ्या कामचुकार पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांना कायमस्वरूपी शासकीय सेवेतून निलंबित करावे अशी मागणी तेल्हारा शहरात जोर धरत आहे.आता महाराष्ट्र सरकारच्या गुटखाबंदीच्या आदेशाला न मानणाऱ्या कामचुकार पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होते की गुटखा माफियांवर कारवाईचा प्रकरण दाबल्या जाते याकडे संपूर्ण तेल्हारा शहर व तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.