यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील पंचायत समितीअंतर्गत असलेल्या एका अतिदुर्गम अशा क्षेत्रात राहुन दोन दशकापेक्षा अधिक काळ आपली प्रशासकीय सेवा बजावणारे एक कर्तव्यनिष्ठ व प्रेमळ असे असलेले आदर्श ग्रामसेवक रुबाब महंमद तडवी हे आपल्या प्रदीर्घ सेवेतुन काल दि.३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहे.
यावल पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामसेवक म्हणुन मागील २९ वर्ष आव्हानात्मक प्रशासकीय सेवा बजावणारे रूबाब महंमद तडवी हे मुळ पाल तालुका रावेर येथील रहिवासी असून रूबाब तडवी यांचा पाल येथील जन्म कष्टकरी शेतकरी महंमद तडवी यांच्या कुटुंबात झाला. पाल येथील शासकीय आदीवासी आश्रमशाळेत त्यांनी आपले शिक्षण पुर्ण केले असून प्रथम १९८८ मध्ये न्हावी येथील मधुकर सहकारी साखर कारखान्यात फिल्डवर्कवर त्यांनी एक वर्ष कार्य केले.प्रशासकीय सेवेचा प्रारंभ १९९४ मध्ये त्यांनी सर्वप्रथम हंबड्री ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकपदाची सुत्रे सांभाळून केली.त्यानंतर त्यांनी मालोद,वाघझिरा,ईचखेडा,चारमळी याठीकाणी ग्रामसेवक म्हणुन सेवा बजावली.जामन्या गाडऱ्या या सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या अतिदुर्गम क्षेत्रातीत गावात त्यांनी २९ वर्ष प्रशासकीय सेवा बजावली.दरम्यान त्यांना महाराष्ट्र शासनाचा २o१६-१७ चा आर्दश ग्रामसेवक पुरस्कार देखील मिळाला आहे.याचबरोबर त्यांनी २९ वर्ष यावल तालुका ग्रामसेवक संघटनेची तालुकाअध्यक्ष म्हणुन धुरा सांभाळली आहे.अशा प्रकारे आपल्या एक उमदा कार्यशैलीत २९ वर्ष यशस्वी प्रशासकीय सेवा देणारे रूबाब महंमद तडवी हे काल दि.३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहे.