यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील निंबादेवी धरण हे निसर्गसौदर्यासाठी प्रख्यात असून लोणावळ्याच्या भुशी डॅमप्रमाणे याला देखील पायर्या असल्यामुळे येथे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होत असते.सध्या कडाक्याच्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक जण या धरणात पोहण्यासाठी येत असतात.याचप्रमाणे तालुक्यातील सावखेडासीम गावाजवळच्या आदिवासी वस्तीवरील नेनू किसान बारेला (वय १०) व आसाराम शांतीराम बारेला (वय १४) हे दोन लहान बालक धरणावर काल दि.३० रोजी सायंकाळी आंघोळीसाठी गेले होते.सदरहू सदरील बालकांचा या धरणात बुडून मृत्यू झाला असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.यातील एका बालकाचा मृतदेह मिळाला असून दुसर्या बालकाचा अद्याप
शोध सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील निंबादेवी धरणात काल दि.३० मे रोजी सावखेडासीम गावाजवळच्या आदिवासी वस्तीवरील नेनू किसान बारेला (वय १०) व आसाराम शांतीराम बारेला (वय १४) हे दोन लहान बालक पोहण्यासाठी गेलेली असतांना ही दोन्ही बालके पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही परिणामी ही दोन्ही बालके बुडाली असून यात या बालकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.सदरील माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचा शोध सुरू केला असून यात आसाराम शांताराम बारेला या बालकाचा मृतदेह आढळून आला असून नेनू किसान बारेला या बालकाचा अजून पत्ता लागलेला नाही याबाबत
रात्री उशीरापर्यंत ही शोध मोहिम राबविण्यात आली सुरू हो ती.सदरील दोन बालकांच्या मृत्यूमुळे आदिवासी वस्तीसह परिसरावर शोककळा पसरली आहे.