बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले जाणार येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली आहे.राज्य सरकारने त्यासंबंधीचे परीपत्रक जारी केले आहे.काही वेळापूर्वी अहमदनगर जिल्ह्याचे नाव आहिल्यादेवी होळकर नगर केले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली असून त्यापाठोपाठ आता बारामती वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक आहिल्यादेवींचे नाव देण्याचा निर्णय सरकारकडून जाहीर करण्यात आला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती या संस्थेचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामती असे नामाधिकरण करण्यात येत आहे त्या अनुनुषंगाने आवश्यक ती कार्यवाही आयुक्त,वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मुंबई यांनी करावी असा आदेश परिपत्रकात देण्यात आला आहे.