Just another WordPress site

कुस्तीपटूंना न्याय मिळण्याकरिता राज ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी २३ एप्रिलपासून कुस्तीपटू जंतर-मंतरवर आंदोलन करत आहे परंतु २८ मे ला नव्या संसद भवनासमोर आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या कुस्तीपटू व पोलिसांमध्ये मोठा राडा झाला होता त्यानंतर ३० मे कुस्तीपटू हे आपली पदके गंगेत विसर्जित करण्यासाठी हरिद्वार येथे गेले होते अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून लक्ष घालण्याची मागणी केली आहे.राज ठाकरे म्हणाले की,“सन्मा.भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी,ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’ असा करत आलो,ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदक बघायला मिळाली असे कुस्तीपटू न्यायासाठी आक्रोश करत असतांना २८ मे ला ज्या पद्धतीने त्यांची जशी फरफट झाली तशी फरफट पुन्हा होऊ नये तसेच आपण स्वतः ह्या विषयात लक्ष घालून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि सन्मानजनक तोडगा काढावा व भारतीय क्रीडाजगताला आश्वस्त करावे ही नम्र विनंती.”

पत्रात राज ठाकरेंनी म्हटले आहे की,“सस्नेह जय महाराष्ट्र,आज तुमचे एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा पत्रप्रपंच.खरे तर लक्ष वेधून घेणे हे तेव्हा म्हणता येईल जेव्हा तुम्हाला त्या विषयाची पुरेशी माहिती नसेल तर.पण आपणांस हा विषय माहीत आहे हे नक्की त्यामुळे आता ‘प्रधानसेवक’ ह्या नात्याने आपण ह्या विषयाकडे लक्ष द्यावे ही विनंती.ज्यांचा गौरव आपण ‘देश की बेटियाँ’असा करत आलो आहोत आणि ज्यांच्या श्रमातून आपल्या देशाला कुस्तीच्या खेळात अनेक पदके बघायला मिळाली आहेत त्या महिला कुस्तीपटू गेले कित्येक दिवस त्यांच्या मागण्यासाठी दिल्लीत आक्रोश करत आहेत.

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी त्यांचा लैंगिक छळ केल्याची तक्रार आहे अशा परिस्थितीत आपल्याला न्याय मिळावा आणि ह्या लढाईत कोणाच्याही ‘बाहुबला’चे दडपण किंवा अडथळा येणार नाही इतकीच त्यांना खात्री सरकारकडून हवी आहे म्हणजे अर्थात आपणाकडून हवी आहे तसेच ह्या आधी आपण गुजरातचे मुख्यमंत्री असताना उत्तराखंडमध्ये दुर्घटना घडली तेव्हा असो की मुंबईतील २६/११ च्या घटनेच्या वेळेस धाव घेतली होतीत.ही तुमची सहृदयता होती आणि हीच सहृदयता तुम्ही तुमच्या कार्यालयापासून किंवा निवास्थानापासून अवघ्या काही किलोमीटवर असलेल्या महिला कुस्तीपटूंना दाखवावी ही जशी त्या महिला कुस्तीपटूंची आहे तशीच इच्छा,विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पण आहे असे राज ठाकरेंनी सांगितले आहे.त्याचबरोबर कुस्तीपटूंना जर योग्य न्याय नाही मिळाला तर कुठल्या खेळाडूला स्वतःच्या रक्ताचे पाणी करून देशासाठी पदक मिळवावे असे वाटेल?आपल्या देशातील सरकारला जर आपल्या दुखाची पर्वा नाही असे चित्र उभे राहिले तर ‘खेलो इंडिया’ हे स्वप्नच राहील.जर आपण खेळाडूंना देशाचा गौरव म्हणत असू तर मग त्यांची २८ मे ला ज्या पद्धतीने फरफट झाली तशी फरफट होणार नाही आणि त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना आश्वस्त केले जाईल इतके तर आपण नक्कीच कराल ह्याची मला खात्री आहे.आपण ह्या विषयांत लक्ष घालावे आणि ह्या विषयात तोडगा काढावा ही पुन्हा एकदा विनंती,असेही राज ठाकरेंनी पत्रात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.