यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
तालुक्यातील कोरपावली येथील ग्रामपंचायतच्यावतीने थोर समाजसेविका पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९६ जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
यानिमित्ताने सामाजिक क्षेत्रात लक्ष वेधणारे तसेच सामाजीक कार्यात उल्लेखनिय असे योगदानाबद्दल यंदा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार हिराबाई सुरेंद्र पांडव व अलकाबाई महाजन यांना नुकताच देण्यात आला.या निमित्ताने कोरपावली ग्रामपंचायत कार्यालयात आयोजीत करण्यात आलेल्या पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम संपन्न झाला.यात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या भगीनींना शाल,श्रीफळ,सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विलास नारायण अडकमोल,प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता दिनेश पाटील,भरत चौधरी,नबाब तडवी, सुरेंद्र पांडव,कोरपावली ग्रामपंचायत सदस्य सत्तार समशेर तडवी,आरिफ कलंदर तडवी तसेच ग्राम पंचायत कर्मचारी व गावातील सन्माननीय ग्रामस्थ,अंगणवाडी कर्मचारी भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.