यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील श्री मनुदेवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश मिडीयम स्कुलचा दहावीच्या २०२-२३ या वर्षासाठीच्या परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.यात फाल्गुनी विनोद चौधरी हिने ९०.६० टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक,शाहीद मजीत तडवी या विद्यार्थ्यांने ८९.४० टक्के गुण मिळवुन द्वितीय क्रमांक तर दिक्षा दिनेश महाजन या विद्यार्थिनीने ८५ .८० टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक मिळविला आहे.
शाहीद तडवी हा विद्यार्थी परसाडे येथील आदर्श ग्रामसेवक मजीत अरमान तडवी व परसाडे गावाच्या माजी सरपंच नजमा मजीत तडवी यांचा मुलगा आहे.आदीवासी कुटुंबातील शाहीद तडवी यांने यावलच्या ईंग्लीश स्कुलमधुन मिळवलेल्या यशाबदल त्याचे तसेच यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश स्कुलचे संस्थापक अध्यक्ष तथा चेअरमन राजेन्द्र महाजन,आमदार शिरीष मधुकरराव चौधरी,काँग्रेस कमेटी तालुका अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे,काँग्रेसचे पंचायत समिती माजी गटनेते शेखर पाटील,काँग्रेस कमेटी यावल शहराध्यक्ष कदीर खान,उपाध्यक्ष अनिल जंजाळे,मुख्याध्यापिका शिला तायडे,आदीवासी समाज बांधव,शिक्षक शिक्षककेतर कर्मचारी यांनी शाहीद तडवी,दीक्षा महाजन व फाल्गुनी चौधरीने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे कौत्तुक करून त्यांना शिक्षणाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.