Just another WordPress site

यावल तालुक्यात मान्सूनपूर्व वादळी पावसात केळी पिकांचे मोठे नुकसान;शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत !

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यात काल दि.४ जून रोजी दुपारच्या वेळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने अक्षरशः धुमाकुळ घालत अनेक ठिकाणी रहदारीच्या मार्गावर मोठमोठी झाडे कोसळुन वाहतुक बंद झाली तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या केळीच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत यामुळे तालुक्यातील शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला असून जनजीवन कमालीचे विस्कळीत झाले आहे.यात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उभ्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्याने शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.

यावल तालुक्यात व परिसरात काल दि.४ जून रोजी दुपारी ११ ते ११.३०वाजेच्या सुमारास अचानक मान्सूनपुर्वी आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने थैमान घातले.या मुसळधार पावसासह आलेल्या वादळीवाऱ्याने यावल-चोपडा मार्गावर तसेच किनगाव डांभुर्णी,यावल फैजपुर या मार्गावर मोठमोठी झाडे कोसळल्याने सुमारे दोन तास या मार्गावरील वाहतुक बंद करण्यात आली होती.मात्र युद्ध पातळीवर ही झाडे या मार्गावरून बाजुला करण्यात आल्याने पुनश्च या रस्त्यांवरील वाहतुक दोन तासानंतर पुन्हा सुरू करण्यात आली होती.दरम्यान तालुक्यातील फैजपुर व न्हावी,आमोदा,डोंगर कठोरा,वाघझीरा,नायगाव,सांगवी,हिंगोणा,बोरखेडा,न्हावी यागावांसह तालुक्यातील ईतर ठीकाणी देखील गारपिटचा तडाका बसला आहे.या क्षेत्रात मोठया प्रमाणावर केळी पिकांचे सुमारे एक हजार हेक्टराच्या वरील क्षेत्र बाधीत असुन यात शेतकरी बांधवांचे सुमारे जवळपास सहा ते सात कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.ज्या शेतकऱ्यांचे केळी पिकांचे नुकसान झाले असेल अशा शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीच्या टोल क्री क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन यावल तालुका कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.