Just another WordPress site

“महायुतीत लोकसभा व विधानसभेच्या जागा दिल्या तरच त्यांच्यासोबत लढू,नाहीतर स्वबळावर”

प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांची पत्रकार परिषदेत माहिती

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
प्रहार जनशक्ती पार्टीचे सर्वेसर्वा आणि अमरावतीतल्या अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत महायुतीत अमरावतीची जागा आपल्या पक्षाला मिळावी अशी मागणी केली होती.भाजपा आणि शिंदे गटाकडे एक लोकसभेची जागा (अमरावती) आणि १५ ते २० विधानसभेच्या जागा मागणार आहोत अशी त्यांनी माहिती दिली होती तसेच निवडणुकीची तयारी सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले होते दरम्यान बच्चू कडू यांच्या दाव्यावर आता शिक्कामोर्तब झाले असून पक्षाने नुकतीच निवडणुकीसंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे.प्रहार जनशक्ती पार्टीचे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांनी आज दि.५ जून रोजी पत्रकार परिषदेत यासंदर्भात घोषणा केली आहे.याबाबत अनिल चौधरी यांनी म्हटले आहे की,आगामी निवडणुकीच्या संदर्भात मी महाराष्ट्राचा दौरा करणार असून आम्ही आगामी निवडणुकीत विधानसभेच्या १५ व लोकसभेच्या दोन जागा लढणार आहोत.तसेच जिल्हा परिषद,महापालिका निवडणुकाही पूर्ण ताकदीने लढणार असून स्थानिक सर्वेक्षणाअंती त्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

 

अनिल चौधरी पुढे म्हणाले की,आम्हाला महायुतीत लोकसभा,विधानसभेच्या जागा दिल्या तर त्यांच्यासोबत लढू,नाहीतर स्वबळावर लढू.आम्ही सोलापूरमध्ये विधासनभेच्या दोन जागा लढणार आहोत.अमरावतीसह विदर्भात ७ ते ८ जागा लढणार आहोत.उत्तर महाराष्ट्रात लोकसभेची एक जागा आणि विधासनभेच्या दोन जागा लढणार आहोत.आगामी काळात सोलापूर महापालिकेची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.