Just another WordPress site

अंजनगाव सुर्जी येथील उपजिल्हा रुग्णालयाचे खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते भूमिपूजन

गोपाल शर्मा,पोलीस नायक

अमरावती जिल्हा प्रतिनिधी

जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांना उच्च दर्जाच्या शासकीय आरोग्य सेवा निःशुल्क मिळाव्या यासाठी कटिबध्द असणाऱ्या खासदार नवनीत रवी राणा यांच्या अथक प्रयत्नाने मंजूर झालेल्या अंजनगाव सुर्जी येथील २३ कोटी रुपये किमतीच्या ५० बेड क्षमतेच्या उपजिल्हा रुग्णालयाचा  भूमिपूजन कार्यक्रम नुकताच मोठ्या थाटात संपन्न झाला.प्रधानमंत्री विकास कार्यक्रम अंतर्गत केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विशेष सहकार्याने तसेच खासदार नवनीत राणा यांच्या यशस्वी पाठपुराव्याने मंजूर झालेल्या या रुग्णालयात आरोग्यविषयक सर्व सोयीसुविधा,अत्याधुनिक यंत्रसामग्री,एक्स रे,सोनोग्राफी,सुसज्ज ऑपरेशन थिएटर,विविध तपासण्या,आकस्मिक रुग्ण कक्ष आदी सर्व बाबी राहणार असल्याने अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रुग्णांना अमरावती येथे जाण्याची गरज भासणार नसल्याचे खा.नवनीत राणा यांनी म्हटले आहे.

सदरील भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी खासदार नवनीत राणा यांच्या समवेत मंचावर गजेंद्रजी ठाकरे महाराज,माजी आमदार रमेश बुंदीले,जिल्हा आरोग्य अधिकारी ढोले साहेब,रक्तपेढीचे अमोल नालट,बिडीओ खेडकर,नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकडे,रिपाईचे विष्णू कुऱ्हाडे, मुऱ्हा देवी संस्थान अध्यक्ष साहेबराव पखान,माजी जि.प.सदस्य विजय कालमेघ,माजी नगरसेवक डॉ.देशमुख,रजिक अन्सारी,अजय पसारी, पप्पू गौर,विमल माकोडे,सुनीता मुरकुटे,मदन बायस्कार,नायब तहसीलदार काळे साहेब,डॉ.डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी खासदार नवनीत राणा यांनी आपण या जिल्ह्याची खासदार म्हणून आरोग्य,शिक्षण,कृषी,उद्योग,पर्यटन,रोजगार निर्मिती तसेच मूलभूत सोयी सुविधा आदींच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नरत असून देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात या जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण अहोरात्र परिश्रम घेत असल्याचे सांगितले.तसेच लवकरच दर्यापूर,अंजनगाव सुर्जी व अचलपूर,परतवाडा वासियांच्या अस्मितेचा व जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या शकुंतला रेल्वेचा प्रश्न सुद्धा लवकरच मार्गी लागणार आहे.आपण सातत्याने जनतेची कामे करीत असून काही लोक केवळ आयत्या बिळावर नागोबा बनून खासदार म्हणून मी मंजूर करून आणलेल्या कामांना आपल्या नावावर खपवून स्वतःची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगून जनता अतिशय हुशार असून कोणी काय केले ते जनतेला चांगले कळते असे म्हणून आपण विकासकामात राजकारण करीत नसून श्रेय वादाच्या वादात आपल्याला पडायचे नसून जनतेचा विकास हाच आपला ध्यास असल्याचे खासदार नवनीत रवी राणा यांनी सांगताच उपस्थित नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे अभिनंदन केले.

या भूमिपूजन सोहळ्यात सर्व लोकप्रतिनिधी,आरोग्य,सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्व मान्यवरांना आमंत्रित करून विकासाच्या कामात आपण राजकारण करीत नसल्याचे व आपले ध्येय केवळ विकास असून श्रेयवादाच्या भानगडीत आपण पडत नसल्याचे सिद्ध केले आहे.सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अढावूदादा यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीेतेकरीता अजय देशमुख,मंगेश कोकाटे,विठ्ठल ढोले,दशरथ यावले,लिलाताई डिके,तोसीफ भाई,ओम भेलकर,अमोल कावरे,अमोल दाभाडे,निलेश देशमुख,किरण श्रीराव,अमोल कोरडे,हर्षल रेवणे,पवन हीगने,अविनाश काळे,पवन हिंगने आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.