Just another WordPress site

चितोडा येथील तरुणाचा खुन पैशांच्या देवाण घेवाणच्या वादातुन

एक महिला व दोन पुरुष अशा तीन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

यावल-पोलीसनायक (तालुका प्रतिनिधी ) :- तालुक्यातील चितोडा येथील रहिवाशी मनोज भंगाळे या तरुणाचा अतिशय क्रुर पद्धतीने खुन करण्यात आल्याची घटना काल सकाळच्या सुमारास उघडकीला आली होती त्यामुळे परिसर अक्षरशः हादरला होता.सदरील घटनेची तीव्रता लक्षात घेता पोलिसांनी तपासचक्रे फिरवित काही तासातच एक महिला व दोन पुरुष अशा तीन जणांना संशयित म्हणुन ताब्यात घेतले असुन  त्यांची चौकशी सुरू आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की , काल सकाळी सांगवी ते डोंगर कठोरा रस्त्यालगत असलेल्या चंद्रकांत निंबा चौधरी यांच्या कपाशीच्या शेतात मनोज भंगाळे या तरुणाचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता.मयताचे भाऊ हेमराज भंगाळे यांनी यावल पोलिसात फिर्याद दाखल केल्यानुसार पोलिसांनी पुढील तपासचक्रे अधिक वेगाने फिरवायला सुरूवात केली व त्याचीच प्रचिती म्हणुन पोलिसांनी चितोडा गावातीलच महिला कल्पना शशिकांत पाटील व दोन पुरुष अशा तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे व त्यांची कसून चौकशी केली जात आहे.तर लवकरच आरोपींना शोधण्यात यश येईल असा विश्वास पोलीस प्रशासनाच्या वतीने केला जात आहे.

हेमराज भंगाळे चितोडा ,यांनी फिर्यादीत म्हटले आहे की ,मनोज संतोष भंगाळे हा जमीन,प्लॉट,शेती खरेदी विक्रीचा कमिशन एजन्ट म्हणून काम करीत होता.मयत मनोज भंगाळे यांनी  चितोड गावातील कल्पना शशिकांत पाटील या महिलेला काही दिवसांपूर्वी ४लाख रूपये उधारीच्या स्वरूपात दिले होते व हि महिला उधारीचे पैसे देण्याबाबत टाळाटाळ करीत होती.या पैशांच्या मागणीवरून दोघांमध्ये काहीवेळा वाढी झाले होते.दि.२१ऑगस्ट रविवार रोजी रात्री ८ वाजच्या सुमारास मनोज भंगले हे त्यांच्या मालकीच्या एम.एच.१९डी.आर.९५९८ क्रमांकाच्या दुचाकीवर कल्पना शशिकांत पाटील यांनी मला एकट्याला डोंगर कठोरा फाट्याजवळ पैसे घेण्यासाठी बोलावले असल्याचे सांगुन निघून गेले.रात्रभर मनोज भंगाळे हे घरी न आल्यामुळे त्यांचे भाऊ हेमराज भंगाळे यांनी मित्रांसह परिसरात रात्री उशिरापर्यंत शोधाशोध केली मात्र ते कुठेही आढळून आले नाही.

मात्र सकाळी सहा वाजेच्या सुमाराला मनोज भंगाळे हे रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले असल्याची वार्ता संपूर्ण परिसरामध्ये वाऱ्यासारखी पसरली.त्यानुसार सर्व नातेवाईकानी त्या ठिकाणी ठाव घेतली असता मनोज भंगाळे हे रक्ताच्या थारोळ्यात मृत अवस्थेत आढळून आले.फिर्यादीच्या फिर्यादीवरून अप्पर पोलीस अधिक्षक कुणाल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक राजेश मानेगावकर यांच्या दिशा निर्देशनानुसार पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर,विनोद खांडबहाले,पोहेका.सिकंदर तडवी,मुजफ्फर खान,असलम खान,सुशील घुगे,महेंद्र ठाकरे,संदीप सुर्यवंशी यांच्या पथकाने तपासचक्रे फिरवित चितोडा येथील कल्पना शशिकांत पाटील हि महिला व दोन पुरुष अशा तिघांना संशयित म्हणुन ताब्यात घेतले असुन त्यांची कसुन चौकशी सुरू आहे.लवकरच आरोपींचा शोध घेण्यास पोलिसांना यश येईल असा विश्वास पोलीस निरीक्षक राजेश मानेगावकर यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.