“राजकारणाची दिशा भटकवण्यासाठी अशा प्रकारची विधाने प्रकाश आंबेडकर करीत आहेत” देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
पुण्यातील भीमा-कोरेगाव विजयस्तंभ येथे २०१८ साली दंगल झाली होती याप्रकरणी भीमा-कोरेगाव आयोगासमोर चौकशी सुरू आहे.आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आयोगाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसाठी बोलवण्यास सांगितले आहे यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच भाष्य केले आहे.
आयोगाने मला बोलण्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशीसासाठी बोलवावे तसेच २०१८ साली राज्याचे मुख्य सचिव असलेले सुमित मल्लिक आणि पोलीस ग्रामीणचे तत्कालीन पोलीस आयुक्त सुवेझ हक यांनाही चौकशीसाठी आयोगाने पाचारण करावे असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.याबद्दल मुंबईत प्रसारमाध्यांनी देवेंद्र फडणवीसांना विचारल्यावर ते म्हणाले की,याबाबत लोकांनी यापूर्वीही अर्ज केले होते त्यावर आयोगाला जो निर्णय घ्यायचा होता तो घेतला आहे.आयोगाची कार्यकक्षा ठरलेली आहे.प्रकाश आंबेडकर हे निष्णात वकील आहेत.प्रकाश आंबेडकरांना माहिती आहे की आयोगासमोर कोणाला बोलवावे आणि कोणास बोलवू नये परंतु राजकारणाची दिशा भटकवण्यासाठी आणि लक्ष दुसरीकडे वेधण्याकरता अशा प्रकारची विधाने प्रकाश आंबेडकर करीत आहेत अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.