Just another WordPress site

कॉमेडीचा बादशहा राजू श्रीवास्तव यांनी घेतला आज अखेरचा श्वास

दिल्ली-पोलीस नायक(वृत्तसेवा):-प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचे निधन झालं आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात गेल्या 40 दिवसांपासून उपचार सुरु होते. अखेर आज दि.२१ सप्टेंबर २२ रोजी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला.वयाच्या 58 व्या वर्षी त्यांची प्राणजोत मालवली.

१० ऑगस्ट २२ रोजी जिम मध्ये वर्क आऊट करत असताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला होता.त्यांनतर त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केले होते. त्यांची प्रकुती खूपच चिंताजनक होती. अखेर डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्यांची मृत्यूशी झुंज मात्र अपयशी ठरली.कॉमेडिचा बादशहा अशी राजू श्रीवास्तव यांची ओळख होती. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले आहे.त्यामुळे राजू श्रीवास्तव यांच्या जाण्यानं टीव्ही मनोरंजन तसेच बॉलीवूडला मोठा धक्का बसला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.