Just another WordPress site

धुळेपाडा येथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी याकरिता निळे निशाण संघटनेतर्फे आंदोलन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या धुळेपाडा या आदीवासी वस्ती पाडयातील नागरीकांना गेल्या अनेक वर्षापासुन पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असुन शासनाने मंजुर केलेले जल जिवन मिशन या योजनेअंतर्गत काम अडकले असल्याने  ग्रामपंचायतीच्या शिवार वादात आदीवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याकरिता कमालीची भटकंती करावी लागत आहे.परिणामी त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शासन स्तरावरून तात्काळ सोडविण्यात येऊन त्यांच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यात यावा या मागणीसाठी निळे निशाण सामाजीक संघटनाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली आज दि.७ जून २३ बुधवार रोजी यावल पंचायत समितीमध्ये तब्बल चार तास ठीय्या आंदोलन करण्यात आले.मात्र संबंधित अधिकाऱ्यांच्या लिखीत पत्रानंतर सदरील आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याचे संघटनेच्या वतीने कळविण्यात आले आहे.

यावल तालुक्यातील पंचायत समिती कार्यक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या धुळेपाडा या सुमारे ४०० लोकवस्तीच्या ठीकाणी ऐन उन्हाळ्यात नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांच्या आदेशाने जल जिवन मिशन अंतर्गत तालुक्यातील आदीवासी वस्तींसाठी हर घर जल या योजनेस मंजुरी दिली असून सुमारे २५ लक्ष रुपये खर्चाच्या योजनेच्या कुपनलीकेच्या कामास काही दिवसापुर्वी सुरूवात झाली होती मात्र सांगवी ग्रामपंचायत व बोरखेडा ग्रामपंचायतच्या शिवार वादामुळे सुरू असलेला पाणी पुरवठा बंद करण्यात आल्याने येथील आदिवासी बांधवांनी निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्याकडे हि पाण्याची समस्या त्यांच्यासमोर मांडली.त्यानुसार आज दि.७ जून २३ बुधवार रोजी निळे निशाण सामाजीक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे,तालुका अध्यक्ष विलास तायडे, नंदाताई बाविस्कर,महीला मंचच्या तालुका अध्यक्ष लक्ष्मीबाई मेढे,युवक तालुका अध्यक्ष सतिष अडकमोल,अनिल इंधाटे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते व शेकडो आदीवासी बांधव यांच्या वतीने यावल पंचायत समितीमध्ये चार तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाउस्कर यांनी पंचायत समितीच्या कारभाराबद्दल व ग्रामस्थांच्या कामाबद्दल अधिकाऱ्यांची उदासीनता पाहुन नाराजी व्यक्त केली.प्रसंगी आंदोलनकर्त्यांशी सहाय्यक गटविकास अधिकारी किशोर सपकाळे,ग्रामीण पाणीपुरवठाचे सुरवाडे,अभियंता पी.बी.देसले यांच्या मध्यस्थीने तात्काळ तात्रींक अडचणी दुर करून काम सुरू करण्यात येइल असे लिखित आश्वासन मिळाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.