डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :-
येथून जवळ असलेल्या वटार,ता.चोपडा येथे दोन आठवड्यापुर्वी गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन गावच्या सरपंच श्रीमती भिकुबाई सुभाष कोळी, कैलास भिका कोळी,पांडुरंग सुभाष ठाकरे व धनसिंग खंडू ठाकरे या चार कुटुंबीयावर खूप मोठा आघात झाला होता.या स्फोटात त्यांची घरे जळून नष्ट झाली होती तसेच जीवनावश्यक वस्तूंसह खूप मोठी वित्तहानी झाली होती.
सदरहू या दुर्दैवी घटनेने पूर्ण वटार गावावर आघात झालेला असतांना या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.सौ.केतकीताई पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन चारही परिवाराचे सांत्वन केले तसेच त्यांनी सामाजिक दायित्वाची भावना जपत व “बिना संस्कार,नहीं सहकार..!,बिना सहकार,नहीं उध्दार…!!” या उक्तीनुसार त्यांनी या कुटुंबांना तातडीने जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा करीत मदतीचा हात पुढे करून समाजापुढे एक नवा आदर्श उभा केला आहे.परिणामी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.सौ.केतकीताई पाटील यांच्या या कार्याचे संपूर्ण जिल्ह्याभरात कौतुक केले जात आहे.सदर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप डॉ.केतकी पाटील यांचे प्रतिनिधी विश्वनाथ कोळी यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.यावेळी किशोर महाजन,आरोग्यदूत जगदीश पाटील,उपसरपंच खुशाल पंढरीनाथ पाटील,माजी सरपंच बाळू दगडू ठाकरे व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.