गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही ठिकाणी औरंगजेबाचे पोस्टर किंवा व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यावरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे याबाबत संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काही ठिकाणी आंदोलन,मोर्चेही काढण्यात आले.यासंदर्भात औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.मात्र यादरम्यान ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे समोर आले असून खुद्द संजय राऊत यांनी याबाबत माहिती दिली आहे.ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.त्यानुसार इंडिया टीव्हीवर एका चर्चासत्रात ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे सहभागी झाले होते मात्र या चर्चासत्रानंतर त्यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.चर्चासत्र चालू असतानाच मला फोन आला पण मी तो उचलला नाही नंतर फोन केला असता सगळ्यात आधी मला समोरून विचारण्यात आले की तू काय स्वत:ला छत्रपतींचा वंशज समजतोस का?टीव्हीवर पुढेपुढे करून बोलतोयस त्यानंतर मला शिवीगाळ करत गोळी घालून जीवे मारण्याची धमकी दिली असा दावा आनंद दुबेंनी केल्याचे इंडिया टीव्हीच्या वृत्तात नमूद केले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.