“सरस्वतीच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे कुकर,३ पातेले व २ बदल्यांमध्ये आढळले”! पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांची माहिती
ठाणे सत्र न्यायालयाने सुनावली मनोज साने याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
लिव्ह इनमध्ये राहणार्या प्रेयसीची हत्या करून तिच्या शरीराचे असंख्य तुकडे करणार्या मनोज साने याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याने हत्या का केली ते अद्याप स्पष्ट झाले नाही.सरस्वती वैद्यचे तुकडे पोलिसांनी जेजे रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले आहे.सदरहू हत्या करून ज्या प्रकारे त्याने मृतदेहाचे असंख्य तुकडे केले ते क्रोर्य अंगावर शहारे आणणारे आहे.मीरा रोडच्या गीता नगर मधील गीता दिप इमातीच्या ७ व्या मजल्यावर मनोज साने (५६) आणि सरस्वती वैद्य (३२) हे दोघे मागील ५ वर्षांपासून भाड्याच्या सदनिकेत रहात होते.काल दि.७ जून बुधवार रोजी संध्याकाळी त्याच्या घरातून दुर्गंधी येत असल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मनोज साने हा सरस्वतीच्या मृतदेहाचे असंख्या तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवत होता.त्याला बुधवारीच अटक करण्यात आली असून आज दि.८ जून २३ गुरूवार रोजी त्याला ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता मनोज साने याला १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.