Just another WordPress site

“मनोज साने एचआयव्ही संसर्गित,सरस्वती ही मनोज सानेला मामा अशी हाक मारत होती”-पोलीस तपासात धक्कादायक खुलासा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
सरस्वती वैद्य आणि मनोज साने यांनी मंदिरात लग्न केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे मात्र मनोज साने याचे वय जास्त असल्याने ही बाब बाहेर लपवून ठेवली होती व ती ज्या अनाथ आश्रमात वाढली तिथे सर्वांना मनोज मामा असल्याचे सांगत होती.सारस्वती वैद्यला एकूण ४ बहिणी असून सर्व बहिणी अनाथ आश्रममध्ये राहात होत्या.पाच बहिणींमध्ये सरस्वती सर्वात लहान होती त्यांची आई लहानपणी वारली होती आणि वडील वेगळे झाले होते.अनाथ आश्रममधून सरस्वती मुंबईला आपल्या नातलगकडे आली होती त्यानंतर जॉबच्या शोधत असताना मनोज साने याच्याशी ओळख झाली.सरस्वतीला आधार देण्याचे आश्वासन देऊन त्याने तिचा विश्वास संपादन केला.एकत्र रहायचे होते म्हणून दोघांनी मंदिरात लग्न केले होते त्यांनंतर ते बोरिवली येथील फ्लॅटमध्ये राहू लागले.दोघांमध्ये वयाचे अंतर होते त्यामुळे अनाथ आश्रमात जाताना ती सर्वांना साने मामा असल्याची थाप मारत होती.सानेसोबत लग्न केल्याचे तिने बहिणींना सांगितले होते.सरस्वतीच्या बहिणींची डीएनए चाचणी करण्यात येत आहे त्यांनी मृतदेहाची मागणी केली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली आहे.सरस्वतीने आत्महत्या केली असा दावा आरोपी साने याने केला आहे त्याचा तपास सुरू आहे.काल शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी मनोज साने याची कसून चौकशी केली जात असून त्याने दिलेली सर्व माहिती तपासली जात आहे.मीरा रोड येथे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी मनोज साने याने सरस्वती वैद्य यांच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले. त्यानंतर विल्हेवाट लावण्यासाठी कुकरमध्ये शिजवल्याची थरकाप उडवणारी घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस तपासात आता नवीन माहिती समोर येत आहे.
मीरा रोडच्या गीतनगर परिसरात गीता दिप या इमारतीच्या ७ व्या मजल्यावर मनोज साने (५६) आणि सरस्वती वैद्य (३२) हे दोघे मागील तीन वर्षापासून भाड्याच्या सदनिकेत राहत होते पण ३ जूनच्या मध्यरात्री मनोजने सरस्वतीची हत्या केली आणि ४ जूनच्या पहाटेपासून पुढले ४ दिवस तो मृतदेहाचे तुकडे करत होता.विल्हेवाट लावण्यापूर्वी हाडे आणि मांस वेगळे करण्यासाठी तो एकेक अवयव कुकरमध्ये शिजवत होता.कुकर,३ पातेली आणि २ बादल्यांमध्ये मृतदेहाचे असंख्य तुकडे पोलिसांना आढळले आहेत.पोलिसांनी आरोपी मनोजला ७ जूनला अटक केली आहे त्याला न्यायालयाने १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.पोलीस तपासात मनोज सानेने धक्कादायक खुलासे केले आहेत. तो एचआयव्ही संसर्गित आहे त्याच्यात आणि सरस्वतीमध्ये कधीही शारीरिक संबंध प्रस्थापित झाले नाहीत कारण सरस्वती ही तर त्याच्या मुलीसारखी होती असा दावा मनोजने चौकशीत केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.मनोज साने हा बोरीवलीत शिधावाटप केंद्र चालवत होता.२०१४ साली सरस्वती वैद्यशी मनोजची ओळख झाली तर सरस्वती ही अनाथ होती या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले.मागील आठ वर्षापासून दोघे मीरा रोड येथे राहण्यास होते तर खून झाला त्या घरात गेली तीन वर्ष दोघेही राहत होते.

 

श्रद्धा वालकरच्या हत्याकांडापेक्षाही भयंकर हत्याकांड हे मीरा रोडमध्ये घडले आहे या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केली त्यानंतर तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले.काही तुकडे शिजवले,काही भाजले तर काहींची विल्हेवाट लावली मात्र मनोज सानेला अटक करण्यात आली आहे.तसेच सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडेही जे.जे.रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत व या प्रकरणात मनोज सानेची चौकशी सुरु आहे.सरस्वती अनाथ होती तिने मनोज हा आपला मामा आहे आणि तो खूप श्रीमंत आहे अशी ओळख करुन दिली होती अशी माहिती अनाथ आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.सदरील निर्घृण हत्येनंतर सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले मात्र सरस्वती ही मनोजला भेटण्याआधी एका अनाथ आश्रमात राहात होती.आश्रमात काम करणाऱ्या अनु साळवे यांनी सांगितले की सरस्वती ही मनोज सानेला मामा अशी हाक मारत होती तसेच माझा मामा खूप पैसैवाला आहे श्रीमंत आहे असे तिने सांगितले होते.मनोज साने जेव्हा तिच्या आयुष्यात आला त्यानंतर ते दोघे कारने आश्रमात यायचे.सरस्वती तिच्यासह इतर मुलांसाठी जेवण,खाऊ आणि कपडे आणायची असेही साळवे यांनी सांगितले आहे.एनडीटीव्हीने याविषयीचे वृत्त दिले आहे.ती सुरुवातीला यायची तेव्हा ती खुश असायची मात्र दोन वर्षांपासून ती दुःखी होती जास्त कुणाशी बोलायची नाही.सरस्वती जेव्हा १८ वर्षांची झाली तेव्हा ती अनाथ आश्रमातून तिच्या बहिणीकडे गेली होती असेही अनु साळवे यांनी सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.