Just another WordPress site

चिंचोली परिसरात केबल चोरीच्या प्रमाणात वाढ,शेतकरी हवालदिल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यातील उंटावदसह चिंचोली,डोणगाव व डांभुर्णी शेतशिवारात केबलवायरी चोरणा-या चोरट्यांनी गेल्या तिन महिन्यांनपासून धुमाकुळ घातला असल्याने परिसरातील शेतकरीवर्ग कमालीचा हवालदिल झाला आहे.

सध्या शेतीची पेरणीपुर्व मशागतीच्या कामांसह केळी व कपाशीसह इतरही पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी दिवस रात्र शेतात कार्यरत असून यातच तापमानाचा पारा जास्त असल्याने पिकांना दररोज पाण्याची आवश्यकता आहे असे असतांना मात्र या केबलचोरांमुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.एकीकडे पेरणीपुर्व शेती तयार करण्यासाठी व बि बियाणे खरेदीसाठी शेतकरी पैशांची जमवाजमव करीत असतांना शेतीपंपाच्या केबल वायरींची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांना अधीकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.या केबल वायरींनमध्ये असलेल्या तांब्याचा तारा काढून हे केबलचोर विकत असून मात्र शेतकऱ्याला २ ते ३ हजार रूपयांचा भुर्दड बसतो व नवीन वायर येईपर्यंत पिकांना पाणी देता येत नसल्यामुळे पीक परिस्थितीवर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.मागील ३ महिन्यात तीन वेळा केबल वायर चोरीस गेल्या असून दोन दिवसांपुर्वी शेतीची विज रात्री ११ वाजता आली व ११.३० ते १२.३० या वेळातच या केबलचोरांनी कोणतीही भिती न बाळगता उंटावद येथील १५ ते २० शेतकऱ्यांच्या केबल वायरीची चोरी केली आहे.सदरील केबलचोर हे शेतात विजपुरवठा सुरू असतांनाही बिनधास्तपणे वायरी कापून चोरून नेत असल्याचे दिसून येत आहे.चोरटे ट्युबवेलची वायर अगदी जमीनी पासून कापून नेत  आहेत व शेतकऱ्यांना पंप वर काढून नवीन केबल टाकण्यासाठी १५०० ते २००० रुपयांचा भुर्दंड दरवेळेस सोसावा लागत आहे.तरी या केबल चोरींच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी या परीसरात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी परीसरातील असंख्य शेतकरी वर्गाकडुन करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.