Just another WordPress site

जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांचा आदिवासी विद्यार्थ्याला मदतीचा हात

डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक

अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :-

येथून जवळच असलेल्या मण्यावती पाड्यावरील खर्डी या शाळेत शिकत असलेला आदिवासी अपंग विद्यार्थी गुरु बारेला यास जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग जिल्हा परिषद जळगाव व भरत चौधरी यांच्या विशेष सहकार्यातून समाजकल्याण निधी अंतर्गत  नुकतीच तीनचाकी सायकल उपलब्ध करून मदतीचा हात पुढे केला आहे मण्यावती पाड्यावरील गावकऱ्यांकडून आभार मानण्यात आले आहे

याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील खर्डी येथून जवळच असलेल्या  मण्यावती या आदिवासी पाड्यावर व खर्डी येथील शाळेत शिकत असलेला आदिवासी विद्यार्थी गुरु बारेला हा दोन्ही पायांनी अपंग असून तो ऊन,वारा व पाऊस यांची तमा न बाळगता नेहमी शाळेत पायी येजा करीत असे.हि बाब  गरिबीची जाण असलेले कर्तव्यदक्ष जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग जिल्हा परिषद जळगाव व भरत चौधरी यांच्या दूरदृष्टिकोनातून सुटली नाही.सर्व समाजासमोर आदर्श निर्माण करणाऱ्या या अधिकाऱ्यांनी या आदिवासी विद्यार्थ्याला मदतीचा हात पुढे करून त्यास शाळेत येजा करण्याकरिता तीनचाकी सायकल उपलब्ध करून दिली आहे.अधिकाऱ्यांच्या या सेवाभावी कार्याबद्दल त्यांचे सर्व थरातून कौतुक केले जात आहे..सदर योजनकामी गुरु बारेला यास आरोग्यदूत सागर मंगल पाटील व कमलाकर पाटील यांचे सहकार्य लाभले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.