Just another WordPress site

“क्षुल्लक कारणांसाठी युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण”-श्रीकांत शिंदे यांचा आरोप

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

कल्याण लोकसभा मतदार संघात भाजपा कार्यकर्ते सांगतील तोच उमेदवार मान्य केला जाईल अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही अशी भूमिका भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे त्यावर “कुणाच्या पोटदुखीतून युतीत विघ्न निर्माण झाले असेल तर माझ्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे असे मत खासदार श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्हीच ठरवू अशा स्वरुपाचा ठराव केला जातो.आव्हाने देण्यापूर्वी विचार करायला हवा आणि अशी आव्हाने आम्हाला देऊ नका असा इशारा श्रीकांत शिंदे यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांना दिला आहे.दहा महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाऊले उचलली नसती तर काय परिणाम झाले असते याचाही विचार भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी करायला हवा परंतु काही क्षुल्लक कारणांसाठी शिवसेना भाजपा युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू आहे असा आरोपही श्रीकांत शिंदे यांनी केला.

याबद्दल पंढरपूर येथे रवींद्र चव्हाण यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता त्यावर चव्हाण यांनी सांगितले की,भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आणि संघटनेने घेतलेला निर्णय त्यांच्या मनाला पटत असेल.भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्यामुळे इच्छा आणि कार्यकर्त्यांच्या मनात असलेले व्यक्त होणे फक्त भाजपात होते म्हणून त्यांनी ते व्यक्त केले आहे अधिकची माहिती वरिष्ठांना आम्ही देऊ असे चव्हाण यांनी म्हटले आहे.तर कुणाला पोटदुखी होत असेल तर राजीनामा देतो असे श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत.त्याबद्दल विचारल्यावर रवींद्र चव्हाण यांनी म्हटले की, भाजपाच्या कार्यकर्त्यांबाबतच ते बोलले आहेत.भाजपाच्या कार्यकर्त्यांबरोबर तेथील स्थानिक नेते चर्चा करतील.संघटना तेथील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना विचारात घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करेल असे त्यांनी नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.