Just another WordPress site

“सगळे धमकी देणारे लोक भाजपा पुरस्कृत,मला तुमच्या सुरक्षेची गरज नाही” संजय राऊत यांची भूमिका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

राज्यात शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीचे सरकार स्थापन होऊन याच महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे या पार्श्वभूमीवर एकीकडे एकनाथ शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीची चर्चा असतांना दुसरीकडे कित्येक काही महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रीमंडळ विस्ताराचीही जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.यात आमदार अपात्रतेसंदर्भातला निर्णय अद्याप प्रलंबित असल्यामुळेच मंत्रीमंडळ विस्तार लांबल्याचे  बोलले जात आहे तर दुसरीकडे घटकपक्षांकडून यावर जाहीर भूमिका घेतल्या जात असताना ठाकरे गटाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मोठा दावा केला असून अमित शाह यांच्या नांदेड दौऱ्यावरही त्यांनी टोला लगावला आहे.महाराष्ट्र भाजपातील सर्व नेते कमजोर पडल्याचा दावा संजय राऊतांनी यावेळी केला आहे.आमची भूमिका स्पष्ट आहे.उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना काम करतेय.भाजपाला त्यांचे काम करू द्या परंतु महाराष्ट्रातले भाजपाचे सगळे नेते कमजोर पडल्यामुळे दिल्लीतून वारंवार नेत्यांना इथे यावे लागतेय.चांगली गोष्ट आहे म्हणजे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचेच त्यांच्यासमोर आव्हान आहे हे स्पष्ट होत आहे असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान यावेळी शिवसेना एकनाथ शिंदेंनी नसून अमित शाह यांनी फोडली असा दावा करताना संजय राऊतांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर ईडीच्या माध्यमातूनच दबाव आला हे आदित्य ठाकरेंनी सांगितले आहे त्यांच्यासमोर ते कसे रडले हे मलाही माहिती आहे आमचे म्हणणे होते की,आपण खंबीर राहायला हवे हेही दिवस जातील पण हे लोक घाबरले आता मोठ्या गर्जना करतायत पण त्या पोकळ आहेत.भविष्यात भाजपा त्यांना नष्ट केल्याशिवाय राहणार नाही ती सुरुवात झाली आहे कारण त्यांना कोणत्याही प्रकारे महाराष्ट्राचा आवाज उठवणारा पक्ष किंवा संघटना इथे नकोय असे राऊत म्हणाले.दरम्यान महाराष्ट्रातील पाच मंत्र्यांचे राजीनामे घेण्यासंदर्भात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सूचना केल्याची चर्चा रंगू लागली आहे.हे खरे असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत.ही बातमी माझ्या माहितीप्रमाणे खरी आहे त्यात चार मंत्री मिंधे गटाचे आहेत त्यामुळे आता खरे स्फोट त्यानंतर व्हायला सुरुवात होईल.भविष्यात मीही इथे बसूनच ते स्फोट करेन.तसेच राऊतांना जीवे मारण्याची धमकी आल्याची ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहे त्यावर ते म्हणाले,सगळे धमकी देणारे लोक भाजपा पुरस्कृत आहेत.मी गृहमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सांगितलय की मी घाबरणारा नाही.मला तुमच्या सुरक्षेची गरज नाही असे संजय राऊत म्हणाले.

सं

Leave A Reply

Your email address will not be published.