यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळणारे पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू असुन पक्षाच्या प्रचार व प्रसार आणी बळकटीला सर्वांनी अधिक प्रभावी प्रयत्न करावे असे आवाहन राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.यावल येथील खरेदी विक्री संघाच्या व्यापारी संकुलनात असलेल्या पक्षाच्या संपर्क कार्यालयात आज दि.१० जून शनिवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २४ वा वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रा.मुकेश येवले यांचा हस्ते पक्षाचे ध्वजारोहण करण्यात आले.प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांना जिवे ठार मारण्याच्या धमकीचा उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.
पक्षातर्फे हे वर्ष रौप्य महोत्सवी साजरे करायचे असुन पक्षाला सक्षम बनविण्यासाठी सभासद नोंदणी,बुथ सक्षमीकरण करणे,जनतेच्या हितसंबंध जोपासणे,लोकउपयोगी कार्यक्रम आयोजित करणे,जनसामान्यांसाठी कार्यक्रमाचे रौप्य महोत्सवी वर्ष आयोजन करणे असे उपस्थित पदधिकारी यांनी कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करण्यात आले.याप्रसंगी पक्षाचे अध्यक्ष खा .शरद पवार यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा तिव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला व अशा प्रकारे धमकी देणाऱ्यास राज्य शासनाने तात्काळ अटक करून त्यास कडक शासन करावे अशी मागणी ही करण्यात आली.यावेळी प्रा.मुकेश येवले,विजय पाटील,डी.के.पाटील,एम.बी.तडवी,देवकांत पाटील,अन्वर खाटीक,महिला अध्यक्ष सौ.प्रतिभा नीळ,डॉ.हेमंत येवले,अय्युब खान मोहसीन खान,अरूण लोखंडे,बापु जासुद,विनोद पाटील कासवे,आबिद कच्ची,राहुल चौधरी,पितांबर महाजन,राजु करांडे,गुणवंत नीळ,भगवान बेर्डे,चंद्रकांत पाचपोळ,किशोर माळी,वसंत पाटील, समाधान पाटील,किरण पाटील,नितीन शिंदे,राकेश सोनार,ऊसमानभाई,शे.नसीर पेंटर,निलेश बेलदार आदी पक्षाचे कार्यकर्ते व पदधिकारी उपस्थित होते.