Just another WordPress site

लिव्ह इन पार्टनर प्रकरणातील सरस्वती वैद्य यांच्यावर सोमवारी होणार अंत्यसंस्कार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;-

सरस्वतीला आपले शिक्षण पूर्ण करायचे होते ती दहावीला दोन विषयांत अनुत्तीर्ण झाली होती त्यामुळे पुन्हा दहावीची परिक्षा देणार होती. मनोज साने तिला घरातच शिकवत होता.परिक्षा देण्यासाठी त्यांनी अहमदनगर येथील आश्रमातून दाखले देखील आणले होते अशी माहिती तपासात पुढे आली आहे.मीरा रोड येथे राहणाऱ्या सरस्वती वैद्य या तरुणीची तिच्या दुप्पट वयाच्या असलेल्या लिव्ह इन पार्टनर मनोज साने याने निर्घृण हत्या केल्याचे प्रकरण समोर आल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.त्यामुळे या घटनेचा सखोल तपास पोलिसांकडून केला जात असल्याने अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत.यात सरस्वती ही आश्रममध्ये असताना दहावीच्या परीक्षेत दोन विषयांत अनुत्तीर्ण झाली होती यामुळे तिने निराश होऊन त्यावेळी शिक्षण सोडून दिले होते मात्र मनोज साने यांच्यासोबत राहत असताना तिच्या मनात पुन्हा शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा निर्माण झाली होती म्हणून २०१९ रोजी तिने आश्रममध्ये जाऊन आपले प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे जमा केली होती.सरस्वतीला शिक्षण पूर्ण करण्यासाठी आपणच प्रवृत्त केला असल्याचा दावा मनोजने केला आहे यासाठी राहत्या खोलीत त्याने काळा फलक बसून घेतला होता व त्यावर विषयाची नावे लिहली असल्याचे पोलिसांनादेखील दिसून आले आहे मात्र आजपर्यंत सरस्वतीने दहावीची परीक्षा देण्यासाठी प्रवेश घेतल्याचा कोणताही पुरावा मिळू शकलेला नाही.शिवाय काळ्या फलकावर लिहिण्यात आलेल्या विषयांच्या नावात पोलिसांना संशय असल्यामुळे हत्येचे गूढ वाढत असल्याचे मत पोलिसांकडून व्यक्त केले जात आहे.

सरस्वती आणि आपण अनाथ असल्याचा दावा सुरुवातीला आरोपी मनोज सानेने पोलिसांकडे केला होता परंतु हत्येची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर सरस्वतीच्या तीन बहिणींनी पोलिसांना संपर्क साधला आहे यामुळे आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधू नका अशी विनवणी मनोजकडून पोलिसांकडे केली जात आहे.दरम्यान पोलिसांनी बोरोवलीला वास्तव्यास असलेल्या मनोजच्या कुटुंबियांशी संपर्क साधला असून त्याच्या काकाला आणि भावाला जबाब नोंदवण्यासाठी शनिवारी नया नगर पोलीस ठाण्यात बोलावले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.मनोज साने हा वारंवार तपासात पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे हत्याचे पुरावे गोळा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.मात्र या दरम्यान मनोजला त्याने केलेल्या विकृत कृत्याचा कसलाच पश्चाताप झालेला नाही तो सतत शांत राहून केवळ पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांची फिरून-फिरून उत्तर देत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.सरस्वतीच्या बहिणींनी तिच्या शरीराचा ताबा देण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे त्यामुळे तिच्या बहिणीची सोमवारी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.याचा अहवाल प्राप्त होताच त्यानंतर सरस्वतीच्या शरीरावर सोमवारी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.