मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;-
महिलांचे चारित्र्य बदनाम करून वावरणाऱ्या जितेंद्र आव्हाड सारख्या गिधाडाचे हरण मीच करणार असा घनाघाती आरोप भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.ट्विटरद्वारे दोघांमध्ये सुरू झालेला वाद शिगेला पोहोचला असल्याचे दिसून येत आहे.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत शिवीगाळ केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केल्यानंतर त्यास आव्हाड यांना जुन्या घटनांचा संदर्भ देत सावधगिरीने बोलण्याचा सल्ला दिला होता.मात्र आव्हाडांच्या भाषेमुळे चित्रा वाघ या प्रचंड संतापल्या असून त्यांनी पुन्हा आव्हाडांवर गंभीर आरोप केले आहे.
जितेंद्र आव्हाड हे गिधाड आहेत ते मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाण्याची त्यांना सवय आहे.मी त्यांच्या आईवर कोणतेही आरोप केले नव्हते मात्र रात्री १२ नंतरच दारू किंवा गांजा पिऊन आव्हाड महिलांच्या चारित्र्यावर ट्विटरद्वारे बोलत असतात.गेली वीस वर्षे मी त्यांच्या पक्षात वावरले तेव्हा त्यांना माझे चरित्र चांगले वाटत होते.आज पक्ष बदलला तर माझ्या चारित्र्यावर ते प्रश्न उभे करून मला बदाम करण्याचा प्रयत्न करत आहेत अश्या वृत्तीची लोक महिलांना उच्च पदावर काम करताना पाहू शकत नाही.मात्र मी सावित्रीबाई फुले,रमाबाई अशा थोर महिलांच्या विचाराने वाढलेली त्यांची मुलगी असून जितेंद्र आव्हाड सारख्या गिधाडाचे लवकरच हरण करणार आहे असे वक्तव्य चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.