Just another WordPress site

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

देहू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३३८ वा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला.तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे.पालखीचा आजचा मुक्काम हा इनामदार वाड्यात असेल.पुन्हा उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल.देहूतून बाहेर पडताच अनगडशहा बाबा या ठिकाणी पालखीची आरती होईल.ज्ञानोबा-माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करतील त्यानंतर तुकोबांची पालखी पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.

टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक देहूत दाखल झाले असून मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे.शनिवारपासूनच देहू नगरीत शेकडोच्या संख्येने वारकरी दाखल झाले होते.आज सकाळी देखील इंद्रायणी नदीमध्ये पवित्र स्नान करून वारकऱ्यांनी तुकोबांचे दर्शन घेतले.पहाटेपासून विधिवत पूजा,आरती नंतर या सोहळ्याची सुरुवात झाली.पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,मावळचे खासदार श्रीरंग बारणे,आमदार उमा खापरे,हर्षंवर्धन पाटील,सुनेत्रा पवार,आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पूजा संपन्न झाली.वर्षातून एकदा येणाऱ्या या आषाढी वारीसाठी देहू,आळंदीमध्ये हजारो वारकरी दाखल होतात.ज्ञानोबा-तुकोबाच्या गजरामध्ये देहभान हरपून टाळ-मृदंगाच्या तालावर स्वतःला झोकून दिल्याचे पाहायला मिळाले.फुगडी,भगवी पताका घेऊन एक-एक दिंडी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.