Just another WordPress site

शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे अपघात हा संशोधनाचा विषय – माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या मृत्यूची चौकशी करा अशी मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केली आहे.आनंद दिघे यांचा मृत्यू अपघातात झाला नव्हता तर त्यांचा खून झाला होता असा दावा संजय शिरसाट यांनी केला आहे तसेच ते म्हणाले की हा खून कोणी केला होता याची चौकशी करावी यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनही प्रतिक्रिया आली आहे.शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आणि छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा आरोप केला आहे.चंद्रकांत खैरे म्हणाले की,आनंद दिघे यांचे निधन झाले तेव्हा मी दिल्लीत होतो त्यानंतर मी आणि राम नाईक आम्ही दिघे साहेबांच्या अत्यंयात्रेला आलो होतो.आम्हाला माहितीपण नव्हती की तिथे कोण होते शेवटच्या क्षणी तिथे कोण होते.तो सगळा संशोधनाचा विषय आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले कि,बरेचसे लोक,शिवसैनिक म्हणतात ते एकनाथ शिंदेंचे कारस्थान असू शकते.आता त्याची चौकशी केली पाहिजे.दिघे साहेबांबरोबर आम्ही काम केले आहे.एक जबरदस्त माणूस होता.ते तुरुंगात गेले तेव्हा अगदी शाळकरी मुलांनीदेखील त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी मोर्चा काढला होता.ते तुरुंगात कसे गेले तर एका गद्दार नगरसेवकाने शिवसेनेशी गद्दारी केली होती त्यावेळी शिवसेनेचा महापौर पदाचा उमेदवार होता त्याला त्या नगरसेवकाने पाडले होते.एका मताने शिवसेनेचा महापौर होऊ शकला नाही त्यानंतर दिघे साहेब चिडले.तो माणूस (विरोधात मत देणारा नगरसेवक) संपला नंतर.., दिघे साहेबांना त्यात अटक झाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.