अडावद ता.चोपडा
पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील अडावद येथे वाळूने भरलेल्या भरधाव ट्रॅक्टरने पायी चालणाऱ्या ३० वर्षीय तरुणास जबर धडक दिली दिल्याने त्यात तो जागीच ठार झाला आहे.राजेंद्र झिंगा धनगर ( सोनवणे ),वय ३० रा. कमळगाव ता. चोपडा असे या मृत तरुणाचे नाव आहे.सदरील घटना अडावद येथील कृषी विद्यालयाजवळ दि.११ रविवार रोजी सकाळी ११:३० वाजता हि घटना घडली.याबाबत अडावद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक वृत्त असे की,तालुक्यातील कमळगाव येथील रहिवाशी राजेंद्र झिंगा धनगर वय ३० वर्षे हा तरुण कामानिमित्त अडावद-चोपडा मार्गावरील कृषी विद्यालयाजवळ पायी निघाला होता.यादरम्यान दि.११ जून रविवार रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने राजेंद्र यास जबर धडक दिली यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.याप्रकरणी ट्रॅक्टरचालक रवींद्र विजय कोळी वय २९,रा.सुटकार ता. चोपडा यास वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.मृत राजेंद्र धनगर याच्या पश्चात आई,वडील,पत्नी, मुलगा,मुलगी असा परिवार आहे.सदर घटनेची अडावद पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून पुढील तपास अडावद पोलीस करीत आहेत.