यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील वढोदा येथील सामाजीक कार्यकर्ते नरेंद्र दयाराम सोनवणे यांची राष्ट्रवादीचे युवक काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.याबाबत जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील यांच्या वतीने त्यांना निवडीबाबत नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
नरेंद्र सोनवणे हे तालुक्यातील वढोदा येथील रहिवासी असून विरावली विकास सोसायटीचे ते विद्यमान व्हा.चेअरमन आहेत त्याचबरोबर त्यांना समाजसेवेची फार आवड असल्याने ते नेहमी समाजसेवेत तत्पर असतात.त्यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,विधानसभेचे क्षेत्र प्रमुख अनिल साठे,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष ॲड.देवकांत पाटील,राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील,रोहन महाजन,तालुका उपाध्यक्ष पवन पाटील,समन्वयक किशोर माळी,जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील,राष्ट्रवादी कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे,गिरीश पाटील,संजय पाटील,लीलाधर सोनवणे,सुनील सोनवणे,राजू सोनवणे,भाऊडू पाटील,नरेंद्र कोळी,योगेश पाटील आदींनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.