Just another WordPress site

“आळंदी येथील वारकऱ्यांवरील लाठीचार्ज घटनेचा देहू संस्थांकडून निषेध” -विश्वस्त माणिक महाराज मोरे

देहू-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
आळंदी वारकरी बांधवांवर लाठीचार्ज करण्यात आला असून सदर घडलेली घटना निषेधार्थ आहे त्याचा मी निषेध करतो.पोलिसांनी वारकऱ्यांना संयमाने हाताळायला हवे होते.वारकऱ्यांना आपुलकीने,प्रेमाने सांगितले असते तर असे मुद्दे उपस्थित झाले नसते असे देहू संस्थांचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी म्हटले आहे.प्रशासनाने आत्मचिंतन करावे असा सल्लादेखील त्यांनी दिला आहे.

 

आळंदीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याच्या वेळी मंदिराच्या दिशेने धावणाऱ्या तरुण वारकऱ्यांना पोलिसांनी काठीने अडवले व त्यांच्यात झटापट झाली काहींना हाताने धरून बाजूला करण्यात आले या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून घटनेचा निषेध केला जातो आहे.यासंबंधी देहू संस्थांचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी आपले म्हणणे मांडले असून आळंदीत झालेला प्रकार हा निषेधार्थ आहे.पोलिसांनी वारकऱ्यांना हाताळताना संयम ठेवायला हवा होता त्यांना आपुलकीने,प्रेमाने सांगितले असते तर असे मुद्दे उपस्थित झाले नसते.दोन्ही बाजूने विचार करण्याची गरज आहे.वारकरी हे शिस्तबद्ध आहेत ते कोणावरही आक्रमण करणार नाहीत परंतु अशा पद्धतीची वागणूक दिली तर त्यांना नक्कीच वाईट वाटेल.प्रशासनाने आत्मचिंतन करावे अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी असे माणिक महाराज मोरे यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.