Just another WordPress site

“येत्या ४८ तासांत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल !” हवामान खात्याचा अंदाज

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
मान्सूनने रविवारी दक्षिण कोकणातील काही भागांसह व दक्षिण मध्य महाराष्ट्रात आगमनाची वार्ता दिली.दरम्यान येत्या ४८ तासांत तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.सिंधुदुर्ग,गोवा,रत्नागिरी व कोल्हापूरचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे.रत्नागिरी,शिवमोगा,हासन,धर्मपुरी,श्रीहरीकोटा,धुबरी येथून मान्सूनचा प्रवास सुरू आहे.येत्या ४८ तासांत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे.

 

येत्या ४८ तासांत मान्सून अरबी समुद्राचा काही भाग,कर्नाटक आणि महाराष्ट्राचा काही भाग,तामिळनाडूचा उर्वरित भाग,आंध्र प्रदेशचा काही भाग,दक्षिणमध्य आणि वायव्य बंगालचा उपसागर,ईशान्य भागातील काही राज्य,पश्चिम बंगाल,सिक्कीम आणि बिहार राज्यात मजल मारण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.