यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेल्या मारूळ गावात उम्मेद फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दि.१२ जुन २०२३ रोजी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते सैय्यद जावेद अहमद यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन रक्तदान व गरोदर महिला तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.या शिबिरात ५१ तरुणांनी रक्तदान केले.सैय्यद जावेद अहमद हे सामान्य माणसातील असामान्य उतुंग असे व्यक्तीमत्व असुन जनसेवचे व्रत ही त्यांना परमेश्वराकडुन मिळालेली एक दैवशक्ती आहे त्यामुळे न थकता न थांबता गोरगरीब जनतेची सेवा करण्याचे बळ त्यांच्यात आहे ही वास्तविकता नाकारता येणार नाही. गावाचा सर्वांगीण विकास व गोरगरीब जनतेची सेवा हे लक्ष त्यांचे आहे व त्यामध्ये त्यांना यावल रावेर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार शिरिषदादा चौधरी,माजी जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे,माजी यावल पंचायत समिती गटनेते शेखर पाटील यांचे अनमोल सहकार्य मिळाले आहे.
यावेळी मारुळ सरपंच तथा महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचे यावल तालुका उपाध्यक्ष असद सैय्यद व त्यांचे सर्व ग्रा.पं.सदस्यांच्या मेहनतीने गावच्या विकास कामाचा रथ यशस्वीपणे चालत असल्याचे मनोगत व्यक्त केले.तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रभाकर सोनवणे,शेखर पाटील, पोलीस पाटील नरेश मासोळे,सरपंच तथा महाराष्ट्र सरपंच परिषदेचे यावल तालुका उपाध्यक्ष असद सैय्यद,माजी चेअरमन जियाउलहक सैय्यद,मारुळ सह वि.का.सोसायटीचे चेअरमन मसरुर अली सैय्यद,खरेदी विक्री शेतकी संघाचे माजी चेअरमन सुनिल फिरके,न्हावीचे लोकनियुक्त सरपंच देवेंद्र चोपडे,नदीम पिंजारी,ग्रा.पं.सदस्य मतिउर रहेमान पिरजादे,सिताराम पाटील,मुर्तेजा अली सैय्यद,गफ्फार तडवी,अमिर तडवी,संदिप तायडे,विकास सह सोसायटी चेअरमन कबिरुद्दीन फारुकी,कॉग्रेस अल्पसंख्याक यावल तालुका अध्यक्ष इखलास सैय्यद,शहर अध्यक्ष रहेमान खाटिक,राष्ट्रवादी फैजपूर शहर अध्यक्ष अनवर खाटिक,प्राथमिक शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शफिक सैय्यद, सचिव मुख्तार सैय्यद,वारेस अली सैय्यद,सामाजिक कार्यकर्ते हसरत अली सैय्यद,साहेब अली सैय्यद,उम्मेद फाऊंडेशनचे अध्यक्ष साद सैय्यद,उपाध्यक्ष रिजवान सैय्यद,सचिव फैजान अहमद,सर्व पदाधिकारी,माजी ग्रा.पं.सदस्य प्यार मोहमद सैय्यद,सौरभ तायडे,युवराज इंगळे यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी अनवर खाटिक,सैय्यद रिजवान सर,शेखर पाटील,प्रभाकर सोनवणे इत्यादीनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब तायडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कारकुन परवेज अख्तर सैय्यद, सलिम सैय्यद,शफिक फारुकी,अखलाक फारुकी यांनी परिश्रम घेतले.