Just another WordPress site

“शिंदे गटाच्या आकडेवारीवरून राज्यातील निम्मी लोकसंख्या सरकारवर नाराज” – राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’अशी जाहीरात शिवसेनेच्या शिंदे गटाने करतानाच राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची आकडेवारी एका सर्वेक्षणाच्या आधारे जाहीर करून फडणवीस यांच्यावर कुरघोडी करण्यात आली आहे शिंदे गटाच्या या प्रतापामुळे भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने बहुतांशी सर्व वृत्तपत्रांमध्ये पानभर जाहीरात प्रसिद्ध केली आहे त्यात मुख्यमंत्रीपदाच्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना २६.१ टक्के लोकांनी तर फडणवीस यांना २३.२ टक्के लोकांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदीपदासाठी कौल दिल्याचा उल्लेख आहे ही बाब भाजपला फारची झोंबली आहे. दुसऱ्या आकडेवारीत राज्यात भाजपला ३०.२ टक्के तर शिवसेनेला १६.२ टक्के कौल जनतेने दिला आहे.राज्यातील ४६.४ टक्के जनता भाजप आणि शिवसेना युतीला पुन्हा सत्तेत आणण्यास इच्छूक असल्याचा दावा करण्यात आला आहे.युतीला ४६.४ टक्के कौल असल्याच्या आकडेवारीवर भाजपकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे याचाच अर्थ ५३.६ टक्के जनता युती सरकारच्या विरोधात असल्याचा अर्थ होतो. शिवसेनेच्या आकडेवारीवरून राज्यातील निम्मी लोकसंख्याही सरकारवर समाधानी नाही हेच सिद्ध होते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे हे फडण‌वीस यां च्यापेक्षा तीन टक्के मतांनी आघाडीवर असल्याची आकडेवारी ही फडणवीस यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखीच आहे.महाविकास आघाडीचे सरकार पाडल्यावर पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे फडणवीस यांचे स्वप्न भंग पावले त्यानंतर नाईलाजाने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावे लागले.शिंदे यांच्या हाताखाली काम करावे लागत असतानाच आता पुन्हा शिंदे यांनी आपणच पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी वातावरण निर्मिती सुरू करणे हे फडणवीस यांच्यासाठी धक्कादायकच आहे.गेल्या काही दिवसांपासून शिंदे गट आणि भाजपमध्ये कमालाची कटुता निर्माण झाली आहे.शिंदे गटातील पाच मंत्र्यांना आवरा किंवा डच्चू द्या अशी तंबी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले.शहा आणि शिंदे व फडणवीस यांच्या भेटीनंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी पाच मंत्र्यांबद्दलची माहिती उघड केली होती त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली ही बातमी पेरण्यामागे फडणवीस यांचा हात असल्याचा शिंदे गटाचा संशय आहे याशिवाय ठाणे आणि कल्याण या शिंदे यांच्या बालेकिल्ल्यांतील दोन लोकसभेच्या जागांवर भाजपने दावा केला हे शिंदे यांना पसंत पडलेले नाही यातूनच शिंदे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना राजीनाम्याची भाषा करावी लागली या साऱ्याचा परिपाक म्हणजे आज शिंदे गटाने प्रसिद्द केलेली जाहीरात असल्याचे बोलले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.