Just another WordPress site

“भविष्यात शिंदे गटाचे आमदार एकनाथ शिंदेंना सोडून भाजपात जातील” -विनायक राऊत यांचे भाकीत

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा शिंदे गटावर कुरघोडी करत आहे असेही बोलले जात आहे.दरम्यान शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी सूचक विधान केले आहे.४० आमदारांमुळे भाजपा पुन्हा एकदा सत्तेत आली त्यामुळे ४० आमदारांनी आपली ताकद ओळखावी असे कीर्तीकर म्हणाले यावर ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.शिंदे गटातील दहा मंत्री सोडले तर सगळ्या आमदारांच्या मनात खदखद आहे त्यांना केवळ मंत्रीमंडळ वाढीचे गाजर दाखवण्यात येत आहे हे सर्व आमदारांना कळून चुकले  आहे त्यामुळे भविष्यात शिंदे गटातील आमदार एकनाथ शिंदेंना सोडून भाजपात जातील असे भाकीत विनायक राऊत यांनी रत्नागिरी येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना केले आहे.

गजानन कीर्तिकरांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता विनायक राऊत म्हणाले,गजानन कीर्तिकर यांनी जे मत व्यक्त केले आहे ते खरे आहे. शिंदे गटाचे १० मंत्री सोडले तर सगळ्यांच्या मनात खदखद सुरू आहे त्यांना केवळ मंत्रीमंडळ वाढीचे गाजर दाखवायचा प्रकार चालू आहे हे सर्व आमदारांना कळून चुकले आहे तसेच विकास कामांबद्दल सर्वांचीच नाराजी आहे.शिंदे गटातील आमदारांना ५० खोके आणि शंभर कोटींची विकास कामे देण्याचे जाहीर केले होते.त्यांना ५० खोक्यांपैकी काही खोके दिले पण विकास कामांच्या बाबतीत सर्वांचीच नाराजी आहे त्यांनी मंजूर केलेली कामेही रद्द केली.१० पैकी ४ ते ५ मंत्र्यांचे ऐकून घेतले जात असून बाकीचे मंत्रीही अशीच आदळआपट करत आहेत त्यामुळे भविष्यात शिंदे गटाचे आमदार एकनाथ शिंदेंना सोडून भाजपात जातील किंवा अन्य मार्ग पत्करतील अशी दाट शक्यता आहे अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.