मुंबई काँग्रेसनंतर प्रदेश काँग्रेसमध्येही बदल होणार का असे विचारले असता प्रभारी पाटील यांनी त्यावर सावध पवित्रा घेत थेट उत्तर देण्याचे टाळले.आपण आता कर्नाटक सरकारमध्ये मंत्री असल्याने महाराष्ट्राचा प्रभारी राहणार नसल्याने मी त्यावर काही बोलणे योग्य होणार नाही नवे प्रभारी त्यावर भाष्य करतील असे त्यांनी सांगितले.राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मतभेद सुरु झाले आहेत.शिंदे यांनी सर्व वर्तमानपत्रात जाहीरात देऊन फडणवीस पेक्षा आपणच लोकप्रिय आहोत असे सांगत फडणवीसांची पंचाईत केली आहे.फडणवीस यांना आता ‘दोस्त दोस्त ना रहा’ असे म्हणण्याची वेळ आली आहे अशी टिप्पणी नाना पटोले यांनी केली आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राज्यात महाविकास आघाडी मजबूत करण्याबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत करण्यात आला.बैठकीत लोकसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन निवडणूक रणनीतीवरही चर्चा करण्यात आल्याची माहिती राज्याचे प्रभारी एच.के.पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.राज्यातील सध्याची परिस्थिती व आगामी लोकसभा निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी प्रभारी एच.के.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी चर्चगेट येथील गरवारे क्लब येथे पक्षाच्या गाभा समितीची बैठक झाली.या बैठकीत लोकसभा मतदार संघनिहाय आढावा घेण्यात आला.राज्यात पक्षसंघटना बळकट करुन जास्तीत जास्त कशा जिंकता येतील यावरही चर्चा करण्यात आली.आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.
बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की,मोदी सरकारने मागील नऊ वर्षांत लोकशाहीचा गळा घोटला आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत या सरकारचा पराभव करणे हे आता काँग्रेस पक्षाचे ध्येय आहे.येत्या १६ जूनला पुन्हा महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाईल असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.