“मनोज साने ‘डेटिंग ॲप’वर अनेक मुलींच्या संपर्कात असल्याचे समजल्यामुळे झालेल्या भांडणातून सरस्वतीची हत्या” -पोलिसांचा मोठा खुलासा
सरस्वतीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी साने याने विद्युत करवत आणि चाकूचा वापर केला होता.हत्या केल्यानंतर त्याने चाकूला धार लावून आणली होती.मृतदेहाचे तुकडे करत असताना विद्युत करवतीची साखळी निघाली होती त्यामुळे ती त्याने दुरुस्तीला टाकली होती असे पोलिसांनी सांगितले आहे.सानेच्या घरातून पोलिसांनी कीटकनाशक जप्त केले आहे हे कीटकनाशक पाजून सरस्वतीची हत्या केली असावी का? याचा पोलीस तपास करत आहे.जे जे रुग्णालयातून मृतदेहाच्या वैद्यकीय चाचणीचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत.सरस्वती वैद्य एकाकी आयुष्य जगत होती.ती कुणाच्याच संपर्कात नसायची.ती साने व्यतिरिक्त कुणाला ओळखत नव्हती की तिला कुणी ओळखत नव्हते. तिच्या बहिणींना साने संपर्क करू देत नव्हता ती दिवसभर घरातच असायची.या काळात ती ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाली होती तिचा मोबाईल सानेच वापरायचा.मनोज सानेने त्याला एचआयव्हीची लागण असल्याचे तसेच तो नपुंसक असल्याचे पोलिसांना सांगितले होते त्याच्या या दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी आज गुरुवारी त्याची पुन्हा वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे.