Just another WordPress site

नांदेड-भुसावळ मुक्कामी बस यावलपर्यंत वाढवावी – प्रवासी संघटनेची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;-

नांदेडहुन भुसावळ येथे येणारी मुक्कामी बससेवा ही प्रवाशांच्या व वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदरील बस ही यावल पर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांच्याकडे तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने नुकतीच करण्यात आली आहे.

याबाबत यावल तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने अध्यक्ष जगदीश कवडीवाले यांच्या नेतृत्वाखाली यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांची भेट घेवुन एसटी आगारातुन प्रवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी प्रवाशी संघटनेच्या वतीने परिसरातील व तालुक्यातील अनेक विद्यार्थी नांदेड या ठीकाणी आपले वैद्यकीय शिक्षणासाठी जात असल्यामुळे यावल आगारातुन थेट नांदेड जाण्यासाठी बससेवा नसल्याने विद्यार्थीवर्ग व प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे.नांदेड एसटी आगाराची बस ही भुसावळ पर्यंत मुक्कामी येते त्या बसला नांदेड ते यावल पर्यंत मुक्कामी करण्यात आल्यास प्रवासांची होणारी मोठी गैरसोय व आर्थिक भुर्दंड टाळता येईल तरी एसटी महामंडळाच्या जळगाव विभागाच्या वतीने प्रवाशांच्या हितासाठी तात्काळ नांदेड ते भुसावळ पर्यंत येणारी एसटी बस सेवा यावल पर्यंत वाढवावी अशी मागणी करण्यात आली आहे.या शिष्टमंडळात जगदीश कवडीवाले,पप्पु जोशी,संतोष धोबी,सागर देवांग,शरद कोळी,ईलीयास खान व आदीवासी सेना तालुका प्रमुख हुसैन तडवी आदींचा समावेश होता.

Leave A Reply

Your email address will not be published.