रावेर-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील नांदुरखेडा येथे आदिवासी एकता परीषद रावेर तर्फे आदिवासी एकता परीषद जिल्हा सचिव बी.आर.तडवी व
रावेर तालुका उपाध्यक्ष रहेमान तडवी यांच्या हस्ते नुकतेच रेशनकार्डचे वाटप करण्यात आले.
नांदूरखेडा ता.रावेर येथील आदिवासी बांधव अनेक वर्षांपासून शासनाच्या रेशनच्या लाभापासून वंचित होते तसेच सदरील आदिवासी भिल्ल बांधवांची परिस्थिती हलाखीची व मागासलेपणामुळे शासन दरबारीही वेळोवेळी मागणी करूनही त्यांना या योजनेचा लाभ मिळत नव्हता. सदरील समस्येबाबत जिल्हा सचिव बी.आर.तडवी यांनी पाठपुरावा करून या आदिवासी भिल्ल बांधवांना न्याय मिळवून दिला आहे.त्यानुसार आदिवासी एकता परीषद जिल्हा सचिव बी.आर.तडवी व रावेर तालुका उपाध्यक्ष रहेमान तडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच रेशनकार्डचे वाटप करण्यात आले.यावेळी युवराज भिल,रमेश भील,ग्रामपंचायत सदस्य आनंद भिल,मोहन भिल,निर्मला भिल,पार्वती भिल,लालसिंग भिल,डिंगबर भिल,पंकज भिल यांच्यासह समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.जिल्हा सचिव बी.आर.तडवी यांनी आदिवासी भिल्ल समाज बांधवांना केलेल्या कार्याबद्दल समाजबांधवांकडून आनंद व्यक्त करण्यात आला असून बी.आर.तडवी व त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले जात आहे.