यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथे ग्रामस्तरीय व प्रभाग कमेटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
यावल येथील तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या सभागृहात खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत ग्रामस्तरीय व मंडळ स्तरीय कमेटी तसेच बुथ कमेटी स्थापन करणे संदर्भात विचारविनिमय करण्यात आला.यात गटनिहाय दौऱ्याची रूपरेषा पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आली आहे.२२ जून २३ डांभुर्णी,उंटावद,दोनगाव,चिंचोली,आडगाव,कासारखेडा गट,२४ जून २३ साकळी दहिगांव गट,२७ जून २३ सावखेडा-हिंगोणा गट व भालोद-पाडळसा गट,२९ जून २३ न्हावी -बामणोद अशी राहणार आहे.सदरील बैठकीला पंचायत समिती माजी गटनेते शेखर पाटील,शेतकी संघ चेअरमन अमोल भिरुड,काँग्रेस कमेटी शहराध्यक्ष कदीर खान,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जलील पटेल,सरपंच परिषद तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे,माजी नगरसेवक रसूल मेंबर,धनु बऱ्हाटे,भरत चौधरी,मारुळ सरपंच असदभाई सय्यद,कॉंग्रेस कमेटी शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे,नईम शेख,तौफिक शेख,शेख रियाज,हाजी गफ्फार शाह,विक्की पाटील,अमर कोळी,लीलाधर सोनवणे,डॉ.योगेश पालवे,नितीन चौधरी भालोद,सचिन तडवी,मतिमूर रहमान,तौफिक खान,नदीम पिंजारी,महेश राणे,योगेश पाटील,अक्षय सोनवणे,सचिन तडवी,उस्मान तडवी,योगेश पाटील,दिनकर फेगडे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.