यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील अंजाळे शिवारात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरहू या मरण पावलेल्या तरूणाची ओळख पटविण्याचे आवाहन यावल पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान त्याच्या शरीरावर पाठीमागे मारहाण झाल्याचे दिसुन येत असल्याने त्याचा खुन तर झाला नाही ना?असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की,तालुक्यातील अंजाळे शिवारात काल दि.२१ जुन रोजी शिकलादेवी मंदीर फाट्यानजीक यावल ते भुसावळकडे जाणाऱ्या मार्गाच्या रस्त्यावरील डाव्या बाजुस असलेल्या चारीमध्ये एका अज्ञात तरुणाचा मृतदेह मिळुन आलेला आहे.याबाबत पोलीसांनी या तरुणाची ओळख पटविण्याचे आवाहन केले आहे.सदरील मयत तरुणाचे वर्णन खालील प्रमाणे आहे. त्या तरूणाचे वय अंदाजे ३० ते ४० वर्षे असावे,रंग-काळा,उंची ५ फुट ५ इंच,कपडे JACKEY या कंपनीची अंडरपॅंट व पांढऱ्या रंगाची नाईट पॅंट त्यावर नेव्ही ब्लु पट्टा,केस काळे,शरीर बांधा मध्यम असे वर्णन असुन वर नमुद अनोळखी मयत याचा आपले पोलीस स्टेशन हद्दीत तपास होवुन त्याच ओळखबाबत व नातेवाईंकाबाबत माहीती मिळुन आल्यास खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क होण्यास विनंती राकेश मानगांवकर पोलीस निरीक्षक यावल पो स्टे मो नं .८८८८८४१९८८,विनोद गोसावी,सपोनि मो नं ७५८८५१६५५७,संदीप सुर्यवंशी पो.ना. मो न. ८८३०४८२१४३,किशोर परदेशी पो ना. मो.८९९९८७९९९५,यावल पोलीस स्टेशन-लेंडलाईंड क्रमांक ०२५८५-२६१३३३ यावर तात्काळ संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.