Just another WordPress site

“एसटी जागेवर ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले ६२ सदस्य अपात्र होणार” !! तालुक्यात सदरील चर्चेमुळे खळबळ

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

तालुक्यात सन २०२१ च्या सार्वत्रीक निवडणुकीत अनुसुचित जमातीच्या राखीव जागावर विविध पदावर निवडुन आलेले तब्बल ६२ ग्रामपंचायत सदस्य व लोकप्रतिनिधी हे अपात्र होणार ! असल्याची माहिती नुकतीच समोर आली असून या काळात ग्रामपंचायतमध्ये निवडून आलेल्या संबंधित सदस्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे तर तालुक्यात सदरील चर्चेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहीती अशी की,यावल तालुक्यात सन २०२१ या कालावधीत पार पडलेल्या ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनुसुचित जमातीच्या राखीव जागेवर ग्रामपंचायत सदस्य म्हणुन निवडुन आलेले सुमारे ६२ ग्रामपंचायत सदस्यांना आपले पद गमवावे लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान निवडणुकीत अनुसुचित जमातीच्या राखीव जागेवर ग्रामपंचायत सदस्य म्हणुन निवडून आलेल्या सदस्यांना आपले जात वैधता पडताडणीचे प्रमाणपत्र दि.१७ जानेवारी २०२३ पर्यंत सादर करायचे होते.याबाबत तालुक्यातील सामाजीक कार्यकर्ते जुम्मा तडवी यांनी दि.२१ नोव्हेंबर २२ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे निवडणुकीनंतर मुदतीच्या आत आपले जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी तक्रार निवेदनाव्दारे केली होती. त्यानुसार भालोद येथील सामाजिक कार्यकर्ते जुम्मा तडवी यांच्या तक्रारी निवेदनाची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत यावल तालुक्यातील अनुसुचित जमातीच्या प्रर्वगातुन राखीव जागेवर निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली असल्याची चर्चा तालुक्यात चर्चिली जात आहे त्यामुळे मुदतीत आपले जात वैधता पडताडणी प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या तालुक्यातीत विविध ग्रामपंचायतच्या निवडणुकीत राखीव जागेवर विजयी झालेले सुमारे ६२ ग्रामपंचायत सदस्य हे अपात्र होणार असल्याचे संकेत मिळाले आहे.तरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनुसुचित जमातीच्या राखीव जागेवर निवडुन आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रते संदर्भात त्वरीत निर्णय न झाल्यास आदीवासी चळवळीच्या विविध सामाजीक संघटनेच्या माध्यमातुन लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा ईशारा संघटनांच्या वतीने देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.