Just another WordPress site

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन २५ लाखाचा गंडा घालणारी टोळी जेरबंद

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन २५ लाखाचा गंडा घालणाऱ्या टोळीतील दोन महिलासह चौघांना पुणे-बंगळूर महामार्गावरील आणेवाडी पथकर नाक्यावर पकडण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या कडून बुधवारी सायंकाळी देण्यात आले असून त्यांच्याकडून लुटीतील साडे बारा लाख रुपये जप्त करण्यात आले आहे.स्वस्तात सोने देतो असे सांगून पुण्यातील व्यापारी मयूर जैन यांना मंगळवारी सांगलीतील फळमार्केट जवळ बोलावून अशोक रेड्डी याच्यासह अन्य सहकाऱ्यांच्या टोळीने सोन्याचे बिस्किट दाखवून विश्वास संपादन केला व त्यावेळी २५ लाख रुपये घेऊन सोने न देताच पोलीस आल्याचे सांगत पोबारा केला.याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच तातडीने सातारा पोलीसांना कळविण्यात आले व संशयित पुण्याच्या दिशेने जात असल्याचे सांगण्यात आले.

 

त्यानुसार भुईंज पोलीसांनी आणेवाडी येथे नाकाबंदी करून जीप क्र.एमएच १२ पीझेड ७९९२ यातून  जात असलेल्या चौघांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता लुटीतील साडेबारा लाख रुपये मिळाले आहेत.यातील संशयित आरोपी प्रशांत निंबाळकर वय ४८,रा.नांदूर,जि. बुलढाणा, प्रवीण खिराडे वय ३७,रा.खामगाव,जि.बुलढाणा,मानसी शिंदे व नम्रता शिंदे दोघी रा.सारोळा,ता.मुळशी यांना अटक करण्यात आली असून चौघांना न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.