डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
मागील काही दिवसापासुन चोपड़ा शहरामध्ये घरफोडी,चोरी तसेच वाहन चोरीच्या घटना घडलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटनांना प्रतीबंध करण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या घडलेल्या घटना उघडकीस आणण्यासाठी पोलीस अधिक्षक एम.राजकुमार व अप्पर पोलीस अधिक्षक चाळीसगाव रमेश चोपडे यांच्या आदेशान्वये तसेच सहाय्यक पोलीस अधिक्षक चोपडा उपविभाग चोपडा कृषीकेश रावले आणि चोपडा शहर पो.स्टे चे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अजित सावळे,सहा पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण,पो.ना.प्रमोद पाटील,पो.शि.शुभम पाटील,पो.कॉ मनोहर पवार,पो.कॉ सुमेर वाघरे,पो.कॉ प्रकाश ठाकरे,पो.कॉ रविद्र बोरसे,पो.कॉ आत्माराम अहीरे हे दि.१८ जून २३ रोज रात्री ११ वाजेपासून हद्दीत गस्त करीत असतांना सपोनि अजित सावळे व पो.कॉ रविंद्र बोरसे यांना गोरगावले रोडवरील समर्थ पार्क कॉलनी परिसरात आज दि.२२ जून रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घरफोडी व वाहन चोरी करणारा रेकॉर्ड वरील आरोपी प्रशांत जगन वाडे रा.गोरगाव ता.चोपडा हा संशयीतरित्या फिरतांना आढळून आला त्यास ताब्यात घेवून विचारपुस करता त्याने सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलीसांनी त्याचे जवळ असलेल्या काळ्या रंगाच्या पिशवीची झडती घेतली असता त्यात घरफोडी करण्यासाठी लागणारे साहीत्य,एक लोखंडी टॅमी,दोन मोठे स्क्रुडायव्हर,अनेक प्रकारच्या चाबी पकड तसेच एक लॅपटॉप इत्यादी साहीत्य मिळुन आले. त्याबाबत विचारपुस केली असता त्याने कोणतेही समाधान कारक उत्तर न दिल्याने सदर आरोपी याने घरफोडी चोरी केलेली असावी याची पोलीसांना खात्री झाल्याने पोलीसांनी त्यास ताब्यात घेवुन त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने वेगवेगळ्या चोऱ्यांचा खुलासा केला आहे.त्यानुसार प्रशांत वाडे याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनीयम अन्वये गुन्हा दाखल करुन त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
सदरहू प्रशांत वाडे याने आज पहाटे २ ते ३.३० वाजेच्या सुमारास महेंद्र बाळु पाटील रा.तुळजाभवानीनगर यांचे बंद घराचे कुलूप तोडुन सदर घरातुन १ लॅपटॉप,चांदीची वाटी,चमचा,२ पैंजण व रोख सात हजार रुपये चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे.सदर आरोपीवर घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन त्याचेकडुन गुन्ह्यातील उर्वरीत मुद्देमालासह एकुण ३५०००/-रुपये किमतीचा मुद्देमाल व एक चोरीची अॅक्टीवा मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेली आहे.सदर आरोपीने अजुन अशाच प्रकारचे गुन्हे केलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीने सदर आरोपी यास अधिक विचारपुस करुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहे.
मालाविरुध्दचे गुन्हे घडू नये व त्यास प्रतीबंध व्हावा यासाठी लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीसांतर्फे शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये मिटींग घेवून नागरीकांना कॉलनीमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवीण्याबाबत तसेच सुरक्षा रक्षक नेमण्याबाबत घराच्या आजुबाजुला पुरेसे लाईट चालु ठेवण्याबाबत व कॉलनीतील पोलीस मित्रांनी रात्रीच्या वेळेस पोलीसांबरोबर गस्त करुन मालाविरुध्दच्या गुन्ह्यांना प्रतीबंध करण्यासाठी मदत करण्याचे अवाहन करण्यात येत आहे.तरी नागरीकांनी रात्रीच्या वेळेस आपल्या कॉलनीमध्ये वरील प्रमाणे उपाय योजना करुन आपल्या भागात कोणतीही संशयीत व्यक्ती किंवा वाहन फिरतांना दिसुन आल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क करावा आणी मालाविरुध्दच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सहकार्य करावे.याकरिता पोलीस प्रशासनाच्या वतीने रोज रात्रीसाठी २ अधिकारी व ८ कर्मचारी यांची गस्त लावण्यात येत असून सदरचे अधिकारी हे रात्रीच्या वेळी वेगवेगळ्या भागात गस्त तसेच आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करून अशाप्रकारच्या घटना भविष्यात घडू नये याकरिता प्रयत्नशील राहणार असल्याचे चोपडा शहर पो.स्टे चे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या वतीने कळविण्यात आले आहे.